Vinod Tawde on Majha Katta : बिहारची सत्तासमीकरणं कशी बदलली ? विनोद तावडे 'माझा कट्टा'वर
Vinod Tawde on Majha Katta : बिहारची सत्तासमीकरणं कशी बदलली ? विनोद तावडे 'माझा कट्टा'वर
लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी जेडीयू (JDU) फोडण्याचा प्रयत्न केला. तसं करून तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले असते. तर गुंडाराज आलं असतं. ते रोखण्यासाठीच नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबत पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केला. विनोद तावडे यांनी 'माझा कट्टा'वर संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले.
विनोद तावडे यांनी सांगितले की, इंडिया आघाडीमध्ये सगळं आलबेलं नव्हते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडीचे अध्यक्ष नियुक्त केल्यानंतर नितीश कुमार नाराज झाले होते. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजपने त्यांच्यातील नाराजीचा फायदा आम्ही घेतला. जेडीयूमधील काही नेते संपर्कात होते. त्यांच्यासोबत संवाद होता. त्यातूनच आम्ही सत्ताबदल केला असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले.