TOP 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha
TOP 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार, उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता.
सरकारमधून मुक्त करा, फडणवीसांची शाहांना फोनवर विनंती, कालच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांची शाहांशी फोनवर चर्चा, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, शाहांचा फडणवीसांना निरोप.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक. अमित शाह, राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित. मित्रपक्षांशी चर्चेचा अजेंडा काय असावा, कोणत्या प्रमाणात मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अपक्ष खासदारांना कसं स्थान द्यावं यावर झाली चर्चा.
शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेलं यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधूक, राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मतदारसंघात घेणार जनमताचा कौल, अजित पवारांसमोर आमदार वाचणार अडचणींचा पाढा.
उद्याच्या काँग्रेस बैठकीलाही विशाल पाटील हजर राहणार, तर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार.