एक्स्प्लोर

Smartphone Tips : Android फोनमधील सॉफ्टवेअर Updates कडे दुर्लक्ष करु नका, होऊ शकते 'हे' नुकसान

अपडेट्सकडे दुर्लक्ष करत असाल तर ही चूक वेळीच सुधारा. फोनमधील ऑपरेटिंग सिस्टम (OS) ला अपडेट न केल्यास तुम्हाला नवीन फीचर्स वापरता येत नाहीत. ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

Benefits Of Smartphone Update : आजकाल तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. अनेक गोष्टी या तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलल्या गेल्या आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेकदा साॅफ्टवेअर कंपन्या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेटशी संबंधित नोटिफिकेशन्स पाठवत असतात. परंतु बऱ्याच वेळा वापरकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, कारण या साॅफ्टवेअरला अपडेट करण्याकरता खूप जास्त वेळ लागतो आणि फोनचा डेटा देखील मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मात्र तुम्ही अशा अपडेट्सकडे दुर्लक्ष करत असाल तर ही चूक वेळीच सुधारा. फोनमधील ऑपरेटिंग सिस्टम (OS)  अपडेट न केल्यास तुम्हाला नवीन फीचर्स वापरता येत नाहीत. ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणे तुमच्या फायद्याचे ठरेल. कोणते फायदे होतात ते जाणून घ्या. 

नवीन फोन खरेदी केल्यावर तुम्हाला त्यामध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जन दिले जाते. लेटेस्ट व्हर्जनमुळे तुम्हाला फोनमध्ये नवनवीन फीचर्स वापरता येतात. सोबतच, अनेक कंपन्या पुढील 2 ते 3 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि सिक्युरिटी अपडेट देखील जारी करत असतात. या अपडेटमुळे युजर्सना जुन्या फोनमध्येच नवीन फीचर्स मिळतात. युजर्सला फोन वापरताना चांगला अनुभव मिळतो, नवीन फीचर्स वापरता येतात. 

जास्त सिक्युरिटी मिळते

सध्याच्या काळात Cyber Security खूप महत्वाची आहे. स्मार्टफोन आणि ई-मेल आयडीचे सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण करण्यासाठी कंपन्या सॉफ्टवेअर अपडेट्सकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देतात. 

फोन ऑपरेट करण्यास सोपं

अनेकदा अॅप वापरताना बऱ्याच अडचणी येतात आणि याच अडचणी दूर होण्याकरता कंपनी नवीन अपडेट्स देत असते. जर वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट केले तर फोन ऑपरेट करणे सोपे होते.

फोनचा स्पीड वाढण्यास मदत होते

अपडेटमुळे फोनचा स्पीड वाढतो. जर तुम्ही अपडेट केले तर तुमचा फोन आणि त्यातील अॅप्सचा वेग वाढेल. 

सॉफ्टवेअर अपडेट न करण्याचे तोटे

सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट करा. आजकाल फोन सुरक्षेकडे बरेच लक्ष दिले जात आहे, कारण स्मार्टफोनमध्ये युजर्सचा महत्वाचा आणि वैयक्तिक डेटा असतो. जर तुम्ही सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट केले नाही तर तुमच्या फोनची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे हॅकर्स तुमचा फोन सहज हॅक करु शकतात. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट नोटिफिकेशन मिळेल, तेव्हा तुम्हाला ते लगेच अपडेट करावे लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या

WhatsApp New Features : आता इमोजी, मेसेजऐवजी 'या' हटके फीचरद्वारे व्हॉट्सअॅप स्टेटसला रिप्लाय करा, काय आहे नवीन फीचर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget