एक्स्प्लोर

Data Security: तुमच्या फोनमधून 'अशा' प्रकारे लीक होतात वैयक्तिक गोष्टी; यापासून वाचण्यासाठी घ्या 'ही' काळजी

Cyber Security: आजकाल संपूर्ण जगात एखाद्याच्या मोबाईल फोनमधील वैयक्तिक माहिती चोरुन त्याला ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

Data Security: सध्याचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. त्याचं सर्वसामान्य उदाहरण म्हणजे तुमचा मोबाईल फोन. आपण वैयक्तिक माहिती (Personal Data), वैयक्तिक गोष्टी मोबाईल फोनमध्ये साठवून ठेवतो. पण या जगात असे अनेक जण आहेत जे फोनमधील आपल्या वैयक्तिक गोष्टी चोरून आपल्या जीवनात खळबळ माजवण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे (Modern Technology) हॅकर्स आपल्या फोनमधील माहिती मिळवतात आणि ब्लॅकमेलिंग करतात. या प्रकारापासून वाचण्यासाठी काही सामान्य गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

खरं तर, तुमच्या फोनमधील अथवा इंटरनेटवरील तुमचा डेटा अनेक प्रकारे लीक (Data Leak) होऊ शकतो, अनेक कंपन्या वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक वेळा हॅकर्स डेटा मिळवण्यासाठी कंपन्यांच्या सर्व्हरवर जाणूनबुजून हल्ला करतात. सायबर गुन्हेगार कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे किंवा रिमोट ऍक्सेस घेऊन डेटा चोरतात. हे हॅकर्स इतके हुशार असतात की, ते एखाद्याचा डेटा चोरण्यासाठी (Data Hacking) ते कंपनीच्या नेटवर्कमधील त्रुटी शोधतात.

वैयक्तिक डेटा कसा लीक होतो?

  • कंपनी किंवा एखाद्या साईटच्या निष्काळजीपणामुळे डेटा लीक होऊ शकतो.
  • हॅकरद्वारे डेटा लीक होतो.
  • सायबर गुन्हेगार साईटमधील किंवा नेटवर्कमधील त्रुटी शोधतात.
  • कर्मचाऱ्याला प्यादं बनवून डेटा मागतात.
  • डार्क वेबवर डेटा विकण्याने डेटा चोरी होतो.

देशात डेटा चोरीचा धोका झपाट्याने वाढत आहे का? तर उत्तर आहे होय! सरकारच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2021 मध्ये सायबर क्राइमची 52 हजार 974 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. हे 2020 च्या तुलनेत 5.9 टक्क्यांनी अधिक आहे. तर 2020 मध्ये ऑनलाईन फसवणुकीची 32 हजार 230 प्रकरणं नोंदवण्यात आली. हे प्रमाण एकूण प्रकरणांच्या 60.8 टक्के अधिक आहे.

ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं?

जेव्हाही तुम्ही वास्तविक जगात किंवा ऑनलाईन गोष्टी खरेदी करता तेव्हा तुमचा डेटा इतर लोकांशी शेअर होणार नाही, याची काळजी घ्या. ऑनलाइन कॉल, ऑनलाइन मेसेज आणि लिंक्स उघडण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोनमध्ये काहीतरी गडबड आहे तर तुम्ही सायबर क्राईमशी संपर्क साधू शकता.

ऑनलाईन वेबसाईट्स डेटा चोरतात का?

काही वेबसाइट्स डेटा चोरू शकतात. काही साईट्स या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाहीत, त्यामुळे अनोळखी साईट्सवर जाणं टाळा. माहित नसलेल्या साईटवर तुमची माहिती भरणं आणि लॉग इन करण्याची सवय सोडा. काही साईट्स या हॅकिंगच्या उद्देशाने बनवल्या जातात आणि वापरल्या जातात म्हणून अशा अज्ञात साइट्सवर प्रवेश करणं टाळा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Google Malware App : फोनमधील 'हे' तीन धोकादायक अ‍ॅप्स तातडीने डिलीट करा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
Embed widget