WhatsApp कॉल करणे आता होणार सोपे, होमस्क्रिनवर मिळणार 'हे' खास फीचर
WhatsApp Calling Shortcut: व्हॉट्सअॅपमध्ये 'व्हॉट्सअॅप कॉलिंग शॉर्टकट फीचर' आणणार आहे. यानंतर तुम्हाला एखाद्याला कॉल करण्यासाठी लॉन्ग प्रोसेस फॉलो करावी लागणार नाही.
WhatsApp Calling Shortcut: इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे अॅप इतके यूजर फ्रेंडली आहे की आज तुम्हाला ते प्रत्येकाच्या फोनमध्ये पाहायला मिळेल. युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी मेटा वेळोवेळी अनेक अपडेट्स देखील आणते. दरम्यान, लवकरच व्हॉट्सअॅपवर कॉल (WhatsApp Call) करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार असल्याची बातमी समोर येत आहे. कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये 'व्हॉट्सअॅप कॉलिंग शॉर्टकट फीचर' आणणार आहे. यानंतर तुम्हाला एखाद्याला कॉल करण्यासाठी लॉन्ग प्रोसेस फॉलो करावी लागणार नाही. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
WhatsApp Calling Shortcut: हे आहे नवीन अपडेट
WABetaInfo या व्हॉट्सअॅपच्या डेव्हलपमेंटवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप (WhatsApp) एका नवीन फीचर 'व्हॉट्सअॅप कॉलिंग शॉर्टकट फीचर'वर काम करत आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) कॉल करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. हे नवीन फीचर तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सहज प्रवेश देईल, ज्यामुळे तुम्ही WhatsApp न उघडता लोकांना कॉल करू शकाल. नवीन फीचरच्या माध्यमातून लोक कस्टम व्हॉट्सअॅप कॉलिंग शॉर्टकट तयार करू शकतील. म्हणजेच या अॅपद्वारे तुम्ही ज्या लोकांना सतत कॉल करता त्यांची यादी तुम्ही तयार करू शकता, जी आपोआप होमस्क्रीनवर दिसेल. या फीचर्सच्या मदतीने, तुम्ही एका टॅपमध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये प्रवेश करू शकाल आणि सहजपणे कॉल करू शकाल. एकूणच नवीन अपडेटनंतर एकदा तुम्ही कस्टम कॉलिंग शॉर्टकट तयार केल्यानंतर, तुम्हाला WhatsApp उघडण्याची गरज भासणार नाही. तुम्ही होमस्क्रीनवरूनच लोकांना कॉल करू शकता.
Whatsapp upcoming features 2023 : लवकरच मिळणार हे फीचर्स
व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजर्ससाठी अनेक उत्तम फीचर्सवर काम करत आहे. लवकरच लोकांना स्टेटस रिपोर्ट, स्टेटसवर व्हॉइस नोट, टेक्स एडिट करणे, टेक्स फॉन्ट बदलणे इत्यादी अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळतील.
Soon you will be able to transfer files up to 2GB :लवकरच तुम्ही 2GB पर्यंत फाइल्स ट्रान्सफर करू शकाल
व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या अंतर्गत युजर्स या अॅपद्वारे 2GB पर्यंत फाइल्स ट्रान्सफर करू शकतील. हे फीचर आल्यानंतर ऑफिसमध्ये काम करणे सोपे होणार आहे.
इतर महत्वाची बातमी: