Samsung Galaxy Unpacked 2023: सॅमसंगच्या इव्हेंटमध्ये लॉन्च होऊ शकतात 'हे' पाच जबरदस्त लॅपटॉप, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Samsung Galaxy Unpacked 2023: सॅमसंग यावर्षी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आपला सर्वात मोठा 'सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2023 इव्हेंट' करत आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी पाच जबरदस्त लॅपटॉप लॉन्च करू शकते.
Samsung Galaxy Unpacked 2023: सॅमसंग यावर्षी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आपला सर्वात मोठा 'सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2023 इव्हेंट' करत आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी पाच जबरदस्त लॅपटॉप लॉन्च करू शकते. हे सर्व लॅपटॉप Galaxy Book 3 सीरीजमधील आहेत. या गॅजेट्सबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येथे आम्ही तुम्हाला या पाच लॅपटॉपची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. यातील तुमच्या गरजेनुसार तुम्ही स्वतःसाठी लॅपटॉप निवडू शकता.
Galaxy Book 3
Galaxy Book 3 नवीन 13th Gen Intel Laptop CPU ने सुसज्ज असेल. LPDDR5 RAM आणि PCLe Gen 4 NVMe SSD स्टोरेज यामध्ये दिसेल. यासोबतच हा लॅपटॉप इंटेलच्या इवो सर्टिफिकेशनलाही सपोर्ट करेल. या लॅपटॉपमध्ये इंटिग्रेटेड ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे.
Galaxy Book 3 Pro
Galaxy Book 3 Pro लॅपटॉपमध्ये तुम्हाला आपण बाजूंना शानदार पातळ बेझल मिळू शकते. हा लॅपटॉप 14 इंच आणि 16 इंच अशा दोन स्क्रीन आकारात 3K AMOLED डिस्प्लेसह लॉन्च केला जाऊ शकतो. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला Windows 11 मिळू शकेल. Galaxy Book 3 Pro लॅपटॉप दोन प्रोसेसर पर्यायांसह लॉन्च केला जाऊ शकतो - 13th Gen Intel Core i5 आणि Intel Core i7. या लॅपटॉपमध्ये 16GB पर्यंत DDR5 रॅम आणि 1TB पर्यंत NVMe PCIe Gen4 SSD स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच यात Intel Iris Xe इंटिग्रेटेड ग्राफिक्स देखील मिळू शकते.
Galaxy Book 3 360
Samsung Galaxy Book 3 360 रोटेटिंग स्क्रीनसह लॉन्च केला जाऊ शकतो. Galaxy Book 3 360 मध्ये मोठा ट्रॅकपॅड आणि मेम्ब्रेन कीबोर्ड असण्याची अपेक्षा आहे. याशिवाय यात 63WH बॅटरी असेल. याचे वजन 1.2 किलो असेल. हा 13 मिमी जाड असेल. हा लॅपटॉप दोन प्रकारात येईल. एक 14 इंच आणि दुसरा 16 इंच.
Galaxy Book 3 Pro 360
Galaxy Book 3 Pro 360 लॅपटॉप उत्कृष्ट स्टाईलससह येईल. या लॅपटॉपमध्ये 360-डिग्री हिंग्ज असतील. हे Windows 11 ला सपोर्ट करेल. हा लॅपटॉप 13व्या जनरेशन इंटेल इव्हो i7 प्रोसेसरवर वर्क करू शकतो. यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्टसह, यात 14-इंचाचा डिस्प्ले देखील असेल. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पीकर लॅपटॉपच्या तळाशी ठेवणे अपेक्षित आहे.
गॅलेक्सी बुक 3 अल्ट्रा
सॅमसंग गॅलेक्सी बुक 3 हे अल्ट्रा व्हेरिएंट सीरिजचे हाय-एंड मॉडेल असेल. हा लॅपटॉप नवीनतम 13व्या जनरेशन Intel Core i9-13900H प्रोसेसरवर आधारित असेल. यासह तुम्हाला 32GB LPDDR5 रॅम आणि 1TB NVMe SSD PCIe Gen 4 स्टोरेज मिळू शकते. तुम्ही Galaxy Book 3 Ultra मध्ये Nvidia GeForce RTX 4070 सह GPU देखील मिळवू शकता. याचा डिस्प्ले 2880x1080p च्या रिझोल्यूशनसह 16-इंचाचा 3K AMOLED असेल. यात 76Whr बॅटरी मिळेल जी 136W चार्जरसह येईल.