एक्स्प्लोर

WhatsApp  New Updates : WhatsApp करत आहे 'या' नवीन अपडेट्सवर काम, यामुळे यूजर्सना मिळेल भन्नाट अनुभव!

WhatsApp  New Updates : सध्या व्हॉट्सअॅप फ्लोटिंग अॅक्शन बटणच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे. भविष्यात अॅप अपडेटसाठी बीटा टेस्टर्सना अॅक्शन बटण उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

WhatsApp  New Updates :  जगातील सर्वात लोकप्रिय मेसेंजर अॅप म्हणून व्हॉट्सअॅपची (WhatsApp) ख्याती आहे. यूजर्सना जास्तीत जास्त चांगली सेवा मिळावी, यासाठी व्हॉट्सअॅप नेहमी नवीन अपडेट्स आणत असते. अशातच आता व्हॉट्सअॅप नवीन अपडेट्सवर काम करत असल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअॅपकडून नवीन फ्लोटिंग अॅक्शन बटणच्या निर्मितीवर (WhatsApp new floating action button design) काम सुरू आहे. या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीच कंपनीकडून  Android version 2.23.10.6 साठी व्हॉट्सअॅप बीटा रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये बॉटम नेव्हिगेशन बारसोबत रिडिझाइन केलेला इंटरफेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. Gizmochina  या चीनी वृत्तपत्रातील एका बातमीनुसार, व्हॉट्सअॅपचा हा बदल या गोष्टींचे संकेत देत आहे की, व्हॉट्सअॅप लहान किंवा मोठी पाऊलं टाकत आहे. यामुळे कंपनी आपल्या पूर्ण अॅपलाच नवीन डिझाइनमध्ये लाँच करणार आहे.

नवीन अपडेट्सबद्दल असं समजलं 
   
अॅपच्या रिडिझाइनची शक्यता तेव्हाच निर्माण झाली जेव्हा Android version 2.23.12.3 अपडेटसाठी WhatsApp beta वर टेस्टिंगसाठी उपलब्ध देण्यात आले होते. या टॉगलसाठी नवीन स्टाईल शोकेसही तयार करण्यात आले आहे. कंपनीकडून खूप छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं जात आहे. अलिकडेच अ‌ॅण्ड्रॉईड व्हर्जन 2.23.12.15 च्या  व्हॉट्सअॅप बीटा अपडेटमध्ये (WhatsApp Beta update) एक महत्त्वाचा बदल केला आहे. 

यूजर्स लवकरच नवीन चॅटला करू शकतात सुरू 

सध्या व्हॉट्सअॅप फ्लोटिंग अॅक्शन बटणला नवीन डिझानइनमध्ये लाँच करायच्या तयारीत आहे. हे नवीन फ्लोटिंग अॅक्शन बटण किंचित गोलाकार कडा असलेल्या चौकोनी आकाराचं असेल. हे मटेरियल डिझाइन 3 मार्गदर्शक तत्त्वांनुसार असणार आहे. हे रिडिझाइन फक्त फ्लोटिंग अॅक्शन बटणावर लागू होणार नाही, तर कॉल आणि स्टेटस टॅबवरील बटणांना देखील लागू होणार आहे.

सध्या प्राथमिक अवस्थेत आहे अपडेट 

सध्या फ्लोटिंग अॅक्शन बटणच्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे. भविष्यात अॅप अपडेटसाठी बीटा टेस्टर्सना अॅक्शन बटण उपलब्ध करून दिलं जाईल. कंपनीला यूजर्सकडून नवीन इंटरफेसची रिक्वेस्टही मिळत आहेत. असं मानलं जात आहे की, कंपनीकडून यूजर्सच्या या रिक्वेस्टचाही गांभिर्याने विचार केला जातो. या इंटरफेस रिडिझाइन व्यतिरिक्त कंपनी अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे. या अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये हाय क्वालिटी फोटो शेअरिंगचा समावेश आहे. यामुळे तु्म्ही फोटो इफेक्टचा वापर न करता HD दर्जाचे फोटो शेअर करू शकाल. यासोबत कंपनी अॅण्डॉईड यूजर्ससाठी स्क्रीन शेअरिंग फीचरवर देखील काम करत आहे.

इतर बातम्या वाचा :

WhatsApp Update : व्हॉट्सअॅप आणणार भन्नाट फीचर, कंटेट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरणार; जाणून घ्या कसं असेल नवीन फीचर?

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget