WhatsApp Edit Message Feature : व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज कसा करावा एडिट, स्टेप बाय स्टेप समजून घ्या
WhatsApp Edit Message Feature : व्हॉट्सअॅपवरुन आता जर तुम्ही काही चुकीचा मेसेज पाठवला असेल किंवा त्या मेसेजमध्ये काही माहीत वाढवायची असेल तर आता तुम्हाला एडिट फीचरचा वापर करता येणार आहे.
मुंबई : सुरुवातीला फक्त काही युजर्ससाठी उपलब्ध असलेलं व्हॉट्सअॅपचं (Whatsapp) एडिट फिचर हे सर्वांसाठी उपलब्ध झालं आहे. व्हॉट्सअॅपच्या या फीचरमुळे तुमच्या एखाद्या मेसेजमध्ये (Message) काही चूक असेल तर त्यासाठी तो मेसेज डिलीट करण्याची आता गरज नाही. कारण व्हॉट्सअॅपच्या एडिट फीचरमुळे (Edit Feature) ती चूक तुम्ही दुरुस्त करु शकता. त्यासाठी जर तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट केले नसेल तर लगेल प्लेस्टोरवर जाऊन ते अपडेट करुन घ्या. कारण तुम्ही व्हॉट्सअॅप अपडेट केल्याशिवाय तुम्हाला हे फिचर वापरता येणार नाही.
कसे कराल मेसेज एडिट ?
तुमचे मेसेज एडिट करण्यासाठी सर्वात आधी तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे. त्यानंतर तुम्हाला जो मेसेज एडिट करायचा असेल तो सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर वर तुम्हाला जिथे त्या मेसेजची माहिती तिथेच तुम्हाला एडिट असा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा मेसेज एडिट करता येईल. मेसेज एडिट केल्यानंतर त्याच्या शेजारी असलेल्या बरोबरची खुणेवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा मेसेज एडिट करुन पूर्ण होईल. या एडिटेड मेसेजचे कोणतेही नोटीफिकेश समोरच्या व्यक्तीला जाणार नाही. परंतु त्या मेसेजच्या खाली एडिटेड असं लिहिलं जाईल.
एडिट करण्यासाठी काय आहेत नियम ?
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला तुमचा मेसेज ए़़डिट करण्यासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ असणार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज केल्यानंतर 15 मिनिटांत तुम्ही तो मेसेज एडिट करु शकता. 15 मिनिटांनंतर तुम्हाला तो मेसेज एडिट करता येणार आहे. तसेच तो मेसेज एडिट केल्यानंतर कोणतेही नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला पाठवले जात नाही. तसेच यामध्ये तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही मीडिया फाईल्स एडिट करता येत नाही.
व्हॉट्सअॅपमध्ये सध्या अनेक नवीन फिचर्स अॅड करण्यात आली आहेत. यामध्ये तुम्ही एखादे वयक्तीक चॅट लॉक देखील करु शकता. यामुळे तुमच्या व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी ठेवण्यास मदत होते. तसेच यामुळे तुमचे चॅट तुमच्याशिवाय इतर कोणीही वाचू शकणार नाही. याचसोबत मेसेज एडिट हे फिचर व्हॉट्सअॅपने अॅड केले आहे. मेसेज एडिट हे फिचर सर्वात आधी आयओएसमध्य सुरु करण्यात आले. त्यानंतर त्याची चाचणी घेऊन ते आता सर्वांसाठी सुरु करण्यात आले आहे. मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग स्वत: या फिचरविषयी माहिती दिली होती.