एक्स्प्लोर

What is ONDC : Amazon, Flipkart ला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारचं देसी ONDC प्लॅटफॉर्म, लहान व्यावसायिकांची चिंता मिटली!

What is ONDC : बड्या कंपन्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी  केंद्र सरकारने ONDC प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. यामुळे मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे काय नुकसान होईल?, पाहुयात...

What is ONDC? ऑनलाइन शॉपिंगचा विचार केला की अॅमेझॉन, फ्लिपकार्ट(flipkart), मिंत्रा अशा बड्या कंपन्यांची नावे आपल्या डोक्यात येतात. याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे शॉपिंग, खरेदीचा सोपा पर्याय, वेळेची बचत आणि या कंपन्यांची प्रचंड प्रमाणात होणारी जाहिरात. या कंपन्यांसाठी जाहिरातींचा मोठा वाटा असतो. जाहिरात पाहून आज आपण या कंपन्यांकडून खरेदी करायला लागलो आहोत. ई-कॉमर्समध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि या बड्या कंपन्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी  केंद्र सरकारने ONDC प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मची गरज का भासली आणि विक्रेते, खरेदीदार आणि डिलिव्हरी एजंटसाठी हे कसे फायदेशीर आहे आणि यामुळे मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे काय नुकसान होईल?, पाहुयात...

ONDC म्हणजे काय?

ओएनडीसी म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. म्हणजेच असे नेटवर्क जिथे भारतातील सर्वात लहान उद्योजक आपला माल डिजिटल पद्धतीने विकू शकतील. हा प्लॅटफॉर्म विक्रेते, खरेदीदार आणि डिलर्सला  एकत्र आणण्याचं काम करतो. सध्या भारतात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणारी कोणतीही कंपनी नाही त्यामुळे भारतीय या कंपनीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या कंपन्यांची क्रेझ कमी करण्यासाठी आणि भारतातील लहान व्यावसायिकांना मोठं प्लॅटफार्म उपलब्ध करुन देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय केंद्र सरकारने शोधून काढला आहे. या ONDC रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये करता येणार आहे.  ऑर्डर करण्यासाठी काही प्रमाणात पैसे आकारण्यात येणार आहे. मात्र हे पैसे बाकी कंपन्यांपेक्षा कमी असेल. 

ONDC ची गरज काय?

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट असूनही सरकारला ONDC प्लॅटफॉर्मची गरज का भासली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे भारताची ई-कॉमर्स मार्केट सातत्याने वाढत आहे. 2030 पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक ऑनलाइन खरेदी करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा फायदा अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या बड्या परदेशी कंपन्यांना होईल. भारतीयांचा पैसा या मोठ्या कंपन्यांकडे जाईल.जे भारतातील अर्थव्यव्हस्थेसाठी धोक्याचं ठरु शकतं. कारण आजकाल लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करत आहेत आणि याचा फटका ऑफलाइन दुकानदारांना बसत असल्याचंदेखील समोर आलं आहे.

लहान व्यावसायिकांना मोठा फायदा

कालांतराने हे क्षेत्र जसजसे वाढत जाईल तसतसा नफा वाढेल आणि तो पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतो. याशिवाय अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमुळे भारतातील छोट्या व्यावसायिकांना काम करण्यात अडचणी येत आहेत कारण आजकाल लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करत आहेत आणि याचा फटका ऑफलाइन दुकानदारांना बसत असल्याचं समोर आलं आहे. 

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला देईल टक्कर 

ओएनडीसी प्लॅटफॉर्म लॉंच झाल्यानंतर आपल्याला शॉपिंगसाठी वेगवेगळ्या अॅप्सची गरज भासणार नाही आहे. एकाच वेबसाईवर सगळं काम होणार आहे. यावर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सह बाकी लहान व्यावसायिकांचे प्रॉडक्टदेखील दिसणार आहे. त्यामुळे प्रॉडक्यमधील तुलना करणंही सोपं होणार आहे. लहान व्यावसायिकंही कोणत्याही शहरात माल विकू शकणार आहे.अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या तुलनेत इथे तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टच्या किंमतीतदेखील फरक जाणवणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Offers On Heater Rod : दोन हजारांचा Water Heater Rod फक्त चारशे रुपयात मिळणार; झटक्यात गरम होणार पाणी, बॅचलर पोरांसाठी उत्तम पर्याय!

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget