Twitter Blue : भारतातील यूजर्ससाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सुरु, किती मोजावी लागेल किंमत? वाचा सविस्तर
Twitter Blue Tick Price : भारतातील यूजर्ससाठी ट्विटरने ब्लू टिक व्हेरिफिकेशन सुरु केले आहे. त्यासाठीच्या किमतीबाबत ट्विटरकडून आज माहिती देण्यात आली आहे
![Twitter Blue : भारतातील यूजर्ससाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सुरु, किती मोजावी लागेल किंमत? वाचा सविस्तर Twitter Blue Price India How Much to Pay for Twitter Blue Subscription Mobile Web Check Monthly Yearly Plan Twitter Blue : भारतातील यूजर्ससाठी ब्लू टिक व्हेरिफिकेशन सुरु, किती मोजावी लागेल किंमत? वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/b7a302e0d72c9edb0b4e6d991e0ae898167590942847225_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Twitter Blue Tick Price : भारतातील यूजर्ससाठी ट्विटरने ब्लू टिक व्हेरिफिकेशन सुरु केले आहे. त्यासाठीच्या किमतीबाबत ट्विटरकडून आज माहिती देण्यात आली आहे. भारतासह जगभरातील 15 प्रमुख देशांमध्ये ही सुविधा आजपासून सुरु करण्यात आली आहे. ब्लू टिकसाठी भारतीयांना 650 रुपये मोजावे लागणार आहेत. ज्या 15 देशामध्ये आजपासून ब्लू टिकची सुविधा सुरुवात झाली, त्यामध्ये यूएस, कॅनाडा, जपान, यूके आणि सौदी अरब या देशांचा समावेश आहे.
डिसेंबर 2022 मध्ये ट्विटरने आपली ब्लू टिक सबस्क्रिप्शन मॉडलची घोषणा केली होती. अँड्राइड यूजर्ससाठी आठ डॉलर आणि आयफोन यूजर्ससाठी 11 डॉलर अशी प्रति महिना किंमत ठरवण्यात आली होती. आता आजपासून भारतासह 15 देशात ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरु झालं आहे.
भारतात ट्विटर ब्लू टिकच्या किंमत किती?
ट्विटर वेबवर व्हेरिफिकेशनसह ब्लू सर्विससाठी प्रति महिना 650 रुपये चार्ज करण्यात येणार आहेत. भारतातील ट्विटर ब्लूमध्ये अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइलसाठी प्रति महिना 900 रुपये मोजावे लागणार आहेत. एलॉन मस्क हे Twitter चा भारतात वार्षिक 6,800 रुपयांच्या सवलतीचा वार्षिक प्लॅन देखील देत आहेत. दरमहा अंदाजे रुपये 566.67 रुपये मोजावे लागणार आहेत.
ट्विटर ब्लू मध्ये कोणते फिचर्स -
ट्विटरने यूएसमधील ब्लू सब्सक्राइबर्ससाठी चार हजार शब्दांपर्यंत लिहिण्याची सुविधा दिली आहे.
ट्विटर ब्लू सब्सक्रायबर (यूजर्स) टाईमलाइनमध्ये 50 टक्के कमी जाहिराती दिसतील.
ब्लू चेकमार्कसोबत ट्विटर ब्लू फिचर यूजर्सला चांगला अनुभव मिळण्यासाठी कस्टम अॅप आयकन, कस्टम नेव्हिगेशन, टॉप लेख, ट्वीटला अनडू करता येईल. तसेच मोठे व्हिडीओही अपलोड करता येतील. त्याशिवाय इतर अनेक फिचर्स मिळणार आहेत.
ब्लू, ग्रे आणि गोल्डन टिकचा पर्याय
ट्विटरवरील टिकसाठी (Blue Tick) वेगवेगळे पर्याय देण्यात येणार आहेत. अधिकृत तसेच सरकारी ट्विटर अकाऊंटसाठी राखाडी रंगाचा (Grey) ऑफिशियल टॅग (Official Tag) देण्यात आला आहे. कंपनी किंवा ग्रुपच्या अकाऊंटसाठी ट्विटर अकाऊंटसाठी सोनेरी रंगाची टिक (Golden Tick) देण्यात आली आहे. ब्लू टिक युजरने नाव, प्रोफाईल फोटो, किंवा माहिती बदलल्यावर ब्लू टिक गायब होईल. त्यानंतर पुन्हा व्हेरिफिकेशन केल्यावर ब्लू टिक परत मिळेल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)