Google वर आता तुमचं नावही सर्च करू शकता, गुगलवर तुमचे नाव Add कसे कराल? खास ट्रिक जाणून घ्या
Google : तुम्हालाही गुगलच्या सर्च बारमध्ये दिसायचे असेल, तर गुगलच्या खास एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत
Google : जेव्हा तुम्ही गुगलवर कोणाचेही नाव शोधता, तेव्हा तुम्हाला सेलिब्रिटी किंवा राजकारणी नेत्यांचे फोटो किंवा माहिती पाहायला मिळते. पण आता तुम्हालाही तुमचे नाव सर्च करता येणार आहे, तुम्हालाही गुगलच्या सर्च बारमध्ये दिसायचे असेल, तर गुगलच्या खास एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नाव सर्च करताच तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीसारखे रिझल्ट दिसू लागतील.
Google मध्ये तुम्हालाही तुमचे नाव सर्च करता येणार
हे Add me to Google या फीचरच्या मदतीने शक्य होईल. याद्वारे तुम्ही तुमचे स्वतःचे गुगल पीपल कार्ड तयार करू शकता, ज्यामध्ये तुमच्या नावासह महत्त्वाचे तपशील असतील. जेव्हा तुम्ही गुगलवर तुमचे नाव शोधता, तेव्हा हे सर्व तपशील एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणेच दिसतील. इंटरनेट वापरणारी कोणतीही व्यक्ती गुगल सर्चमध्ये आपले नाव अॅड करू शकते. गुगल सर्च रिझल्टमध्ये तुम्ही तुमचे स्थान कसे बनवाल? हे जाणून घ्या
हे फिचर फक्त निवडक देशांमध्ये जारी
गुगल पीपल कार्ड फक्त मोबाईल फोनवर दिसते. जेव्हा तुम्ही तुमचे नाव शोधता तेव्हा तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर Google People कार्ड दिसणार नाही. अमेरिकन टेक कंपनीने हे फिचर फक्त निवडक देशांमध्ये जारी केले आहे. ही सुविधा केनिया, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिकेसह भारतात उपलब्ध आहे. Google वर तुमची प्रोफाइल तयार करण्यासाठी, तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदी भाषा निवडावी लागेल.
अशा प्रकारे आपले प्रोफाइल तयार करा
पीपल कार्ड बनवण्यासाठी गुगल अकाउंट आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे, या दोन्हीचा वापर यापूर्वी कोणचेही कार्ड बनवण्यासाठी केला गेला नसावा. या सर्व अटी पूर्ण केल्यावर तुम्ही गुगल सर्चवर कार्ड बनवू शकता. Google पीपल कार्ड तयार करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा.
-मोबाईल फोनमधील Google Search वर जा आणि add me to Search असे टाईप करून शोधा.
- तुम्हाला तुमचे Google Search स्वत: ला जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत स्क्रोल करत रहा.
- गेट स्टार्ट वर टॅप करा आणि पडताळणीसाठी मोबाईल नंबर एंटर करा.
- मोबाईल नंबर इंटरनेटवर कोणालाही दिसणार नाही. तुम्ही परवानगी दिली तरच शो होईल.
- पुढील पृष्ठावर स्वतःबद्दल काही मूलभूत तपशील भरा. येथे तुमचे नाव आपोआप भरले जाईल, फक्त स्थान, तुमच्याबद्दल, व्यवसाय, शिक्षण, वेबसाइट, सोशल मीडिया खाती, ईमेल, फोन नंबर आणि मूळ गाव अशी माहिती भरा.
- तुम्ही Preview पर्यायावर टॅप करून तपशील तपासू शकता. जर सर्व काही ठीक असेल तर Sumbit पर्यायावर टॅप करा.
तुमची प्रोफाइल वेगळी कशी दिसेल?
गुगलचे म्हणणे आहे की काही तासांत तुमचे नाव गुगल सर्चवर दिसेल. जर तुमचे आणि एखाद्या सेलिब्रिटीचे नाव एकच असेल, तर तुमच्या नावाचे वेगळेपण दर्शविण्यासाठी तुम्हाला प्रोफेशन किंवा आणखी काही जोडावे लागेल, जेणेकरून तुमची प्रोफाइल वेगळी दिसेल.