X New feature : आता 'एक्स'वर करु शकणार ऑडिओ- व्हिडीओ कॉल; एक्सच्या नव्या फिचरचा फायदा कोणाला?
X New feature : आता 'एक्स'वर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर जोडण्यात आलं आहे. दरम्यान, अँड्रॉइड युजर्ससाठी कंपनीने आणखी हे नवीन फिचर जारी केले आहे.
X New feature : सध्या ट्विटर (twitter)म्हणजेच X मध्ये नवनवे फिचर्स येत आहेत. एक्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरला'द एव्हरीथिंग अॅप' बनवावे, अशी एलन मस्क यांची इच्छा आहे. मस्क यांना अॅपच्या माध्यमातून लोकांना मनोरंजन, बातम्या, मेसेजिंग, पेमेंट या सुविधा पुरवायच्या आहेत. मात्र त्यात आता ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फिचर जोडण्यात आलं आहे. दरम्यान, अँड्रॉइड युजर्ससाठी कंपनीने आणखी हे नवीन फिचर जारी केले आहे. सध्या IOS युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध नाही.कंपनी लवकरच या वापरकर्त्यांसाठी देखील ते लाइव्ह करेल.
व्हॉट्सअॅप-इन्स्टाग्राम फिचर आता एक्समध्ये उपलब्ध
मस्क यांची कंपनी एक्सने अँड्रॉइड युजर्ससाठी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल फीचर लाईव्ह केले आहे. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या एक्स इंजिनिअरपैकी एकाने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. काही भारतीय युजर्सनी एक्सवर याबद्दल पोस्टही केली आहे. या फिचरच्या मदतीने आता तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींशी किंवा तुमच्या फॉलोअर्सशी फेस-टू-फेस व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट होऊ शकता. व्हॉट्सअॅप-इन्स्टाग्राममध्ये जसे व्हिडिओ कॉल फिचर काम करते. त्याचप्रमाणे एक्समध्येही हे फिचर काम करेल. म्हणजेच ऑपरेट करणे अतिशय सोपे आहे.
फक्त प्रीमियम युजर्सच हे फिचर वापरु शकणार!
नव्या ऑडिओ-व्हिडिओ फिचरचा फायदा फक्त एक्स प्रीमियम युजर्सना घेता येणार आहे. फ्री युजर्संना हा पर्याय मिळणार नाही. कंपनीने यापूर्वीच अनेक फिचर्स प्रीमियम युजर्ससाठी मर्यादित केले आहेत. सध्या तरी हे फिचर सर्व पेड युजर्ससाठी उपलब्ध असेल की केवळ प्रीमियम आणि प्रीमियम प्लस युजर्सपुरतेच मर्यादित आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
फिचर कसे चालू करावे ?
व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा पर्याय ऑन करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी आणि सेफ्टीच्या पर्यायावर येऊन येथे डायरेक्ट मेसेजवर क्लिक करून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचा पर्याय ऑन करावा लागेल. असे केल्याने तुम्हाला चॅटमध्ये हा पर्याय दिसेल.
युजरनेम विकण्यासाठी खास हँडल
फोर्ब्सच्या अहवालात समोर आलं आहे की, कंपनी एका समर्पित हँडलवर काम करत आहे. या हँडलवरून या सक्रिय वापरकर्त्यांची म्हणजेच जे युजरनेम एक्स मीडियावर वापरात नाही, अशी नावे विकण्यासाठी कार्यरत असेल. अहवालात असेही म्हटले आहे की, यासाठी एलॉन मस्क यांची कंपनी एक्स खरेदीदारांकडून 50,000 डॉलर म्हणजेच 41 लाख रुपये शुल्क आकारत आहे. हा ईमेल कंपनीच्या एका सक्रिय कर्मचाऱ्याने फोर्ब्सला पाठवला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, कंपनीने अलीकडेच त्यांच्या हाताळणी मार्गदर्शक तत्त्वे, प्रक्रिया आणि शुल्कामध्ये काही बदल केले आहेत.
audio and video calls on X slowly rolling out for android users today! update your app and call your mother
— Enrique 🦖 (@enriquebrgn) January 18, 2024
इतर महत्वाची बातमी-