Google Circle to Search : Google सर्च इंट्रेस्टिंग होणार! स्क्रीनवर सर्कल काढताच मिळणार माहिती; सध्या दोन फोनसाठी फिचर उपलब्ध
Google आपल्या प्रीमियम गॅजेट्समध्ये अनेक AI आधारित सेवा सुरू करत आहे. सॅमसंगही गुगलच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहे. आता गुगल सर्च करणं फार इंट्रेस्टिंग होणार आहे.
Google Circle to Search : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने आपल्या (Google Search) युजर्ससाठी सतत काम करत असते. येवढंच नाही तर वेगवेगळे अपडेट हे गुगल सतत देत असते. Google आपल्या प्रीमियम गॅजेट्समध्ये अनेक AI आधारित सेवा सुरू करत आहे. सॅमसंगही गुगलच्या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहे. आता गुगल सर्च करणं फार इंट्रेस्टिंग होणार आहे.
सर्कल टू सर्च
आता नवीन मोबाईलमध्ये काही सर्च करण्यासाठी तुम्हाला कशावरही क्लिक करण्याची गरज नाही. आता फक्त फोटोला सर्कल मारून कोणत्याही गोष्टीची माहिती मिळू शकते. गुगलने या तंत्रज्ञानाला Circle 2 Search असे नाव दिले आहे. सर्कल काढण्याव्यतिरिक्त, तुम्ही फक्त टॅप करून पण तुम्ही शोधू शकता.
सध्या फक्त दोन फोनमध्ये हे अपडेट मिळणार
सैमसंग गैलेक्सी एस24 अल्ट्रा सोबत येणाऱ्या S Penने हे होऊ शकतं. S24 वर सर्कल टू सर्च अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला फक्त होम बटण जास्त वेळ दाबावे लागेल. यानंतर तुम्ही कोणताही फोटो निवडून AI फीचरचा लाभ घेऊ शकता. हे अपडेट सर्व भाषांना सपोर्ट करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Google चे हे AI फिचर 31 जानेवारीपासून फक्त Google Pixel 8 Pro आणि Samsung Galaxy S24 मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर इतर अँड्रॉईड फोनसाठीही हे फीचर वर्षाच्या अखेरीस लाँच केले जाईल.
नवे फिचर्स आणण्यासाठी प्रयत्न सुरु
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ईमेलमध्ये सांगितले की, कंपनी अनेक फिचर्सवर काम करत आहे. हे नवनवीन फिचर्स युजर्सला देण्यासाठी मोठी गुंतवणूक केली जाईल आणि गुंतवणुक करताना अनेक चांगल्या कर्मचाऱ्यांचीदेखील गरज असणार आहे. मात्र फिचर्स निवडताना आम्हाला काही कठिण निर्णय घ्यावे लागतील. आपल्याला हवे ते फिचर्स तयार करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची कपात करण्याची वेळ येऊ शकते, असंही ते म्हणाले.
लवकरच बंद होणार 'या' वेबसाईट्स
गुगल बिझनेस प्रोफाईलचा (Google) वापर करून तयार करण्यात आलेल्या वेबसाईट्स बंद करणार (Google Shut Down Business Profile) असल्याची घोषणा गुगलने नुकतीच केली आहे. कंपनीने यासाठी मार्च ते 10 जून पर्यंतची डेडलाइन दिली आहे. गुगलने आपल्या एका अधिकृत ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, मार्च 2024 मध्ये बिझनेस प्रोफाइलने बनलेल्या वेबसाइट्स बंद केल्या जातील आणि त्याऐवजी आपल्या साइटला भेट देणाऱ्या युजर्सना तुमच्या बिझनेस प्रोफाईलवर रिडायरेक्ट केले जाईल.
इतर महत्वाची बातमी-