Samsung Galaxy S24 Series : सॅमसंगचे 3 प्रीमियम धमाकेदार स्मार्टफोन्स आज लाँच होणार ; 200 MP कॅमेरा, AI फिचर्स अन् बरंच काही!
कोरियन कंपनी सॅमसंग आज Samsung Galaxy S24 Series लाँच करणार आहे. या सीरिजअंतर्गत Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सह 3 स्मार्टफोन लाँच केले जातील.
Samsung Galaxy S24 Series : कोरियन कंपनी सॅमसंग आज Samsung Galaxy S24 Series लाँच (Samsung) करणार आहे. या सीरिजअंतर्गत Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सह 3 स्मार्टफोन लाँच केले जातील. आज लाँचिंग इव्हेंट होणार आहे. कंपनीच्या वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हा इव्हेंट पाहता येणार आहे. स्मार्टफोनव्यतिरिक्त कंपनी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये गॅलेक्सी AIदेखील लाँच करू शकते.
Samsung Galaxy S24 Ultra : अल्ट्रा मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर कंपनी क्वाड कॅमेरा सेटअप देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. अल्ट्रामध्ये तुम्हाला अॅल्युमिनियमऐवजी टायटॅनियम बॉडी मिळेल. याशिवाय यात 6.8 इंचाचा एमोलेड 2Xक्यूएचडी प्लस डिस्प्ले आणि 5000 एमएएच बॅटरी मिळू शकते.
Samsung Galaxy S24 Plus : प्लस आणि बेस मॉडेलमध्ये तुम्हाला समान कॅमेरा सेटअप मिळेल. प्लसमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा एमोलेड 2X क्यूएचडी प्लस डिस्प्ले, 12 जीबी रॅम, 4900 एमएएच बॅटरी आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळेल.
Samsung Galaxy S24 : फोटोग्राफीसाठी तुम्हाला 8के व्हिडिओ रेकॉर्डिंगसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. यात 6.7 इंचाचा अमोलेड २एक्स एफएचडी डिस्प्ले, 4000 एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह 128 जीबी आणि 265 जीबी स्टोरेज पर्याय मिळू शकतात. डिझाइनच्या बाबतीत Samsung Galaxy S24चे बेस आणि प्लस मॉडेल मागील वेळेसारखेच असतील, तर एस 24 अल्ट्रामध्ये यावेळी कर्व्हऐवजी फ्लॅट डिस्प्ले मिळू शकतो.
या सीरिजची खासियत म्हणजे एआय फिचर्स देण्यात आले आहे. जे कॅमेरा, एडिटिंगसाठी जास्त चांगलं असणार आहे. फोन कॉलदरम्यान लाइव्ह ट्रान्सलेशन, ईमेल रायटिंग, स्मार्ट फोटो एडिटिंग अशा काही फिचर्सची माहिती लीकमध्ये समोर आली आहे. सॅमसंगने स्मार्टफोनची प्री-बुकिंग खूप आधीच सुरू केली होती. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन किंवा सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही फोनचे प्री-बुकिंग करू शकता. प्री-बुकिंग केले तर कंपनी तुम्हाला 5,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा देईल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू आणि स्पेशल एडिशन फोन आणि सॅमसंग क्लब मेंबर होण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये कंपनी वेलकम वॉचर कंपनी ला 5,000 रुपयांपर्यंत देऊ शकते. मोबाइल फोनचे प्री-बुकिंग करण्यासाठी आता 1,999 रुपये मोजावे लागतील, जे रिफंडेबल आहे. डिव्हाईस बुक करण्यासाठी तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
इतर महत्वाची बातमी-
- Ayodhya Ram Mandir Scam : रामभक्त आता सायबर भामट्याचं टार्गेट? राम मंदिराच्या नावाने मोठा Cyber Scam समोर; चुकूनही करु नका 'हे' काम
- Whatapp Update : दोन नंबरसाठी दोन whatsapp अॅपची गरज नाही; एकाच अॅपमध्ये वापरा दोन नंबर, कसं? ते पाहाच!