Ayodhya Ram Mandir Scam : रामभक्त आता सायबर भामट्याचं टार्गेट? राम मंदिराच्या नावाने मोठा Cyber Scam समोर; चुकूनही करु नका 'हे' काम
Ayodhya Ram Mandir : सध्या सगळीकडेच राम मंदिराची चर्चा सुरु आहे. अनेक रामभक्त देणगीदेखील देत आहेत. मात्र राम मंदिराच्या नावाने एक मोठा सायबर फ्रॉड समोर आला आहे.
![Ayodhya Ram Mandir Scam : रामभक्त आता सायबर भामट्याचं टार्गेट? राम मंदिराच्या नावाने मोठा Cyber Scam समोर; चुकूनही करु नका 'हे' काम tech news Ram temple cyber criminals are doing whatsapp scam on the name of vip entry at ram mandir in ayodhya Ayodhya Ram Mandir Scam : रामभक्त आता सायबर भामट्याचं टार्गेट? राम मंदिराच्या नावाने मोठा Cyber Scam समोर; चुकूनही करु नका 'हे' काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/6c77b0b92f4de2ac93e0b21d3a331be51705414419621442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ayodhya Ram Mandir : सध्या सगळीकडेच राम मंदिराची चर्चा सुरु आहे. अनेक रामभक्त (Ayodhya Ram Mandir) रामाची सेवा करण्यासाठी काहीना काही कार्यक्रम घेत आहे तर काही लोक देणगीदेखील देत आहेत. मात्र याच राम मंदिराच्या नावाने एक मोठा सायबर फ्रॉड समोर आला आहे. राम मंदिराच्या नावाखाली सायबर भामटे आपले खिसे भरत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जर तुम्ही राम मंदिराला देणगी देण्यासाठी कोणताही QR कोड स्कॅन करत असाल किंवा पासेससाठी काही मॅसेज येत असतील तर थांबा आधी ही बातमी नक्की वाचा.
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहे. राम मंदिराचं कामदेखील शेवटच्या टप्प्यात पोहचलं आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, बॉलिवूड सुपरस्टार, क्रिकेटपटू आणि देशभरातील खेळाडूंसह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायबर क्राईम करणारे फसवे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फसवण्याची संधी शोधत असतात आणि राम मंदिराच्या माध्यमातून त्यांना एक खास संधी मिळाली आहे. कोट्यवधी लोकांची श्रद्धा राम मंदिराशी निगडित असून सायबर गुन्हेगार याचा गैरफायदा घेत आहेत.
VIP एन्ट्रीच्या बहाण्याने पैसे उकळतात...
खरं तर यावेळी हे लोक अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सर्वसामान्य ांना आणि रामभक्तांना मोफत व्हीआयपी एन्ट्री चा दावा करत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅपवर लोकांना मेसेज पाठवतात, की 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाला जाण्यासाठी त्यांना व्हीआयपी अॅक्सेस दिला जात आहे आणि हे अॅप डाऊनलोड करून तुम्ही VIP पास डाऊनलोड करू शकता. या मेसेजसोबत युजर्सला एपीके फाइल डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. या एपीके फाइल्समध्ये स्पायवेअर किंवा मालवेअर असू शकतात. ज्यातून आपला फोन हॅक केला जाऊ शकतो.
युजर्सच्या प्रायव्हसीला धोका
अशा लिंक्सच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलचा बँक खात्याचा तपशील, कॉन्टॅक्ट नंबर, पासवर्ड अशा सर्व वैयक्तिक डेटाअॅक्सेस करू शकतात आणि मग तुमची लाखो रुपयांची फसवणूक करू शकतात. लोकांना अॅप डाऊनलोड करण्याऐवजी राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी व्हीआयपी एन्ट्री पास दिला जातो, असा कोणत्याही प्रकारचा मॅसेज मंदिर ट्रस्टींकडून पाठवला जात नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)