(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Snapchat Safety : Snapchat यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; सुरक्षेसाठी स्नॅपचॅटने सुरू केले भन्नाट फिचर, वाचा सविस्तर
Snapchat ने एक नवीन फिचर लागू केले आहे. कंपनीने स्ट्राइक सिस्टम (Strike System) आणि डिटेक्शन (Dectation) टेक्नॉलॉजी अॅप आणले आहे.
Snapchat New Feature : आजकाल सोशल मीडिया लोक मोठ्या प्रमाणात वापरतात. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ते वापरले जाते. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाॅट्सअॅप , स्नॅपचॅटसारखे अॅप आज सर्वजणच वापरतात. या अशा अॅप्समुळे अनेकदा यूजर्सची सुरक्षितता धोक्यात येते. अशाच आॅनलाईन होणाऱ्या जोखिमीपासून लहान मुलांचे संरक्षण करण्याकरता Snapchat ने एक नवीन फिचर लागू केले आहे. कंपनीने स्ट्राइक सिस्टम (Strike System)आणि डिटेक्शन (Dectation) टेक्नॉलॉजी अॅप आणले आहे. या अॅपच्या मदतीने जे लोक तुम्हाला चुकीचे मेसेज टाकत आहेत त्यांचे अकाउंट ब्लाॅक केले जाईल. या फिचरच्या मदतीने कंपनी प्लॅटफॉर्मवर मुलांना सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. यामुळे लहान मुले ज्यांना ओळखत नाहीत किंवा त्यांच्या म्युच्युअल फ्रेंड (Mutual Friend) लिस्टमध्ये नाहीत अशा लोकांशी संपर्क साधू शकणार नाहीत.
कंपनीने माहिती दिली की, Snapchat वर अनेकदा अनोळखी लोकांच्या रिक्चेस्ट येतात. मात्र आता या फिचरच्या सहाय्याने यूजर्सकरता एक मेसेज येईल ज्यामध्ये ते त्या अनोळखी अकाउंटाला रिपोर्ट किंवा लगेच ब्लाॅक करू शकतात.
जर एखाद्या मुलाला Snapchat वर नवीन व्यक्ती जोडायची असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीचे आणि मुलाचे काही परस्पर मित्र असले पाहिजेत. तरच त्या नवीन व्यक्तीला अॅड करता येणार आहे. यापूर्वी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत ठराविक म्युच्युअल फ्रेंड्स असतील, तर कोणत्याही प्रकारचा अलर्ट मेसेज येत नव्हता. मात्र आता यासाठी आवश्यक म्युच्युअल फ्रेंड्सची संख्या वाढवण्यात आली आहे. या फिचरमुळे अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येऊन लहान मुलं हिंसक, सेल्फ हार्म, चुकीच्या गोष्टी, यौन शोषण अशा गोष्टींना बळी पडू शकतात. त्यामुळे, अल्पवयीन यूजर्सची सुरक्षा करण्याला कंपनी प्राधान्य देत आहे. या फिचरमुळे तुम्ही रिपोर्ट केलेले अकाउंट स्ट्राइक सिस्टीमच्या साहाय्याने तात्काळ चेक केले जाणार आहे. संबंधित प्रोफाईलमध्ये काहीही चुकीचे आढळल्यास ते अकाउंट डिलीड केले जाईल.
स्नॅपचॅटची सुरुवात 2011 मध्ये सुरू झाली. 'स्नॅपचॅट' या मोबाइल मेसेंजर अॅपची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. फेसबुक, युट्युबला तोडीसतोड स्पर्धा देत आहे. तरुणाईमध्ये हे लोकप्रिय अॅप आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील तीन माजी विद्यार्थीयांनी एकत्र येत 8 जुलै 2011 रोजी आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर स्नॅपचॅटची निर्मिती केली होती.
ही बातमी वाचा: