अश्लील व्हिडीओ बनवून मैत्रिणीच्या होणाऱ्या पतीस पाठवले, जालन्यातील धक्कादायक धटना
jalna Crime News : स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या तरूणाने अश्लील व्हिडीओ बनवून एका तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली.
jalna Crime News : जालन्यात एक धक्कादायक घटना समोर आलीय आहे. स्नॅपचॅट (Snapchat) वरून तरूणीचे अश्लील व्हिडीओ बनवल्या प्रकरणी एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झालेला संशयित हा कोल्हापूर येथील आहे. स्नॅपचॅट वरून या दोघांची ओळख झाली होती. या ओळखीतून संशयिताने पीडित मुलीचे अश्लीस व्हिडीओ बनवल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या व्यक्तीने अश्लील व्हिडीओ बनवून एका तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठवल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली. या ओप्रकरणी पीडित तरुणीने शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी संशयित आरोपी तरुणा विरोधात गुन्हा दाखल केलाय.
संशयित तरुण हा कोल्हापूरचा असून पीडित तरुणी आणि आरोपीची वर्षभरापूर्वी स्नॅपचॅटवर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवले होते.
दरम्यान, पीडित मुलीचे लग्न जमल्याचे कळतात त्याने तिच्या होणाऱ्या पतीला हे व्हिडीओ पाठवले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. माहिती घेऊन पोलिसांनी संबंधित तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला.
jalna Crime News : आईच्या मोबाईलवरून चाट
धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलगी आरोपीला आईच्या मोबाईलवर चाट करत होती. या काळात या दोघांमध्ये भेटी देखील झाल्या. मात्र, दरम्यानच्या काळात आरोपी मुलाने पीडित तरुणीचे स्नॅपचॅटवरून अश्लील व्हिडीओ बनवले आणि हेच व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीस पाठवले. पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा तसेच सायबर अॅक्टनुसार गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी दिली आहे.
या घटनेनंतर जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीवर कोठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेने आणि तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. सोशल मीडियावरून चॅट करनाचा काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याबरोबरच संबंधित तरूणावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस या प्रकरणी कसून तपास करत आहेत. या प्रकरणी संशयितावर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Mumbai Crime : मुंबई पुन्हा हादरली, 15 वर्षीय मुलीवर सहा जणांकडून लैंगिक अत्याचार, तीन आरोपी अल्पवयीन