Instagram Down : इंस्टाग्राम डाऊन, Instagramसह Facebook मेसेंजर वापरण्यात अडथळे, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Instagram Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झालं आहे. जगभरातील युजर्सला इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवर मेसेज पाठवण्यात अडथळे येत आहेत.
Instagram Down : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) डाऊन झालं आहे. जगभरातील युजर्सला इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवर मेसेज पाठवण्यात अडथळे येत आहेत. मेटा (Meta) कंपनीच्यी मालकी असलेल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या सेवेमध्ये अडचण निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळपासून जगभरात काही युजर्सना इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर वापरण्यात अडथळं येत आहेत. बुधवारी सकाळपर्यंत इंस्टाग्रामला 985 हून अधिक युजर्सकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 52 टक्के युजर्सना इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मेसेज जात नाही, अशी तक्रार केली.
युसर्जकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, युजर्सनी पाठवलेले मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत न पोहोचता गायब होत आहेत. बुधवारी सकाळपर्यंतही अनेक युजर्सला या समस्येचा सामना करावा लागला. काही युजर्सची समस्या सुटली आहे, तर अद्यापही काही भागातील इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर सर्व्हर डाऊन आहे.
वेबसाईट सर्व्हिसेस स्टेटस ट्रॅकर डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी रात्री 8 वाजेपासून 6 जुलै रोजी सकाळपर्यंत इंस्टाग्राम मेसेंजर वापरण्यात युजर्सना अडथळे येत होते. त्याशिवाय फेसबुक मेसेंजरवरही युजर्सना हेच अडथळे येत होते.
मेसेंजिंग व्यक्तिरिक्त इतर पर्याय सुरु
इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या वापरतील अनेक युजर्सचे अडथळे दूर झाले आहेत. अद्यापही काही प्रमाणात युजर्सना या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे. मेसेंजर व्यक्तिरिक्त अॅपमधील इतर पर्याय योग्यरितीनं काम करत आहेत. तर काही भागातील युजर्सच्या मेसेंजरच्या वापरातील समस्येचं निराकरण झालं आहे.
दरम्यान, फेसबुक आणि इंस्टाग्राम मेसेंजर डाऊन असताना युजर्सनी त्यांचा राग मीम्सचा वापर करुन दर्शवला आहे. या संदर्भात ट्विटरवर अनेक मीम्स व्हायरल झाल्या आहेत.
पाहा व्हायरल मीम्स
#instagramdown With great Instagram Down, comes great memes..
— Kunwar Fariyad Singh (@KunwarFariyad) July 5, 2022
Zuckerberg trying to fix the dm crash pic.twitter.com/AmkCPTCw2d
Me after checking Instagram DM for 100th time#instagramdown pic.twitter.com/V4dEMQzLN1
— SK Sharma (@SKSharma4747) July 6, 2022
Now I realise ,how much I am addicted to insta after realising it's down #instagramdown pic.twitter.com/XBIikyYsol
— Dhanashree Suryawanshi (@DhanashreeSS06) July 6, 2022
Asking Instagram to fix dms #instagramdown pic.twitter.com/R5BnHrU5VF
— lee_ghost_art (@Lee_ghost_art) July 6, 2022