एक्स्प्लोर

Samsung : सॅमसंग गॅलेक्‍सी ए16 5जी लॉन्च, जाणून घ्या किंमत किती?

Samsung : ट्रिपल कॅमेरासह अल्‍ट्रा-वाइड, 6 वर्षांचे ओएस अपग्रेड्स असलेल्‍या स्‍मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्‍सी ए16 लॉन्च करण्यात आला आहे.

Samsung Galaxy A16 5G : सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतात गॅलॅक्‍सी ए16 5जी च्‍या लाँचची घोषणा केली. युजर्सना अगदी किफायतशीर दरामध्‍ये सर्वोत्तम नाविन्‍यता देत गॅलॅक्‍सीने भारतातील मिड-रेंज स्‍मार्टफोन्‍स उपलब्ध केलेत. हा स्मार्टफोन्स 6 जनरेशन्‍स आणि 6 वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत. 

सॅमसंग गॅलॅक्‍सी ए16 हा 5जी फोन असून 8जीबी/128 जीबी आणि 8जीबी/256 जीबी अशा दोन्ही  व्‍हेरिएण्‍ट्ससह गोल्‍ड, लाइट ग्रीन आणि ब्‍ल्‍यू ब्‍लॅक या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल.हा स्‍मार्टफोन आजपासून रिटेल स्‍टोअर्स, Samsung.com आणि ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍ससह Amazon.in व Flipkart.com वर उपलब्‍ध असेल. टिकाऊपणाला पूरक सॅमसंगची नॉक्‍स वॉल्‍ट चिपसेट आहे. जी पिन, पासवर्डस् व पॅटर्न्‍स अशा संवदेनशील डेटाचे संरक्षण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी सॉफ्टवेअर व हार्डवेअर धोक्‍यांपासून संरक्षणासाठी स्‍वतंत्र टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट स्‍टोरेजसह येते. 

किंमत किती आणि वैशिष्ट्ये काय?

सॅमसंग गॅलॅक्‍सी ए16 हा फोन 18999 या किंमतींपासून सुरु होत आहे. सॅमसंग गॅलॅक्‍सी ए16 5जी स्लीक असण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसची जाडी फक्‍त 7.9 मिमी आहे. ज्‍यामुळे आतापर्यंतचा सर्वात सडपातळ मिड-रेंज गॅलॅक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन आहे.आयकॉनिक 'की आयलँड' आकर्षकता, तसेच सुधारित ग्‍लास्टिक बॅक व सडपातळ बेझल्‍ससह हा स्‍मार्टफोन व्हिज्‍युअली आकर्षक दिसतो. या डिवाईसमध्‍ये भारतीय वापरकर्त्‍यांना लक्षात घेऊन विकसित करण्‍यात आलेले वैशिष्‍ट्य वॉईस फोकस आहे. ज्‍यामधून गोंधळयुक्‍त वातावरणामध्‍ये देखील सुस्‍पष्‍ट संवादाची खात्री मिळते. 

 गॅलॅक्‍सी ए16 5जी मध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. अपग्रेडेड मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर असलेला हा स्‍मार्टफोन हायपर-फास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि विनासायास मल्‍टीटास्किंग देतो. या डिवाईसमध्‍ये ट्रिपल कॅमेरा सिस्‍टम आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्‍सल वाइड, 5 मेगापिक्‍सल अल्‍ट्रा-वाइड आणि 5मेगापिक्‍सल मॅक्रो लेन्‍स आहे.  अल्‍ट्रा-वाइड लेन्‍स विशेषत: नयनरम्‍य लँडस्‍केपेस् आणि व्‍यापक शॉट्स कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रत्‍येक फ्रेममध्‍ये आकर्षक फोटो कॅप्‍चर करत त्‍यांची सर्जनशीलता दाखवता येते.  याला पूरक अशा वैविध्‍यपूर्ण सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह मोठी 6.7 इंच फुल एचडी+ स्क्रिन आहे.                                  

ही बातमी वाचा : 

मोठी बातमी! देशातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या IT कंपनीला 6506 कोटींचा नफा, गुंतवणूकदारांना मोठा लाभांश जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Mahayuti Cabinet Expansion: मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
Sanjay Raut: राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :   10 AM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : अदानीला गिळता यावं यासाठीच गैरमार्गाने सत्ताबळकावलीय - संजय राऊतTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Mahayuti Cabinet Expansion: मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
Sanjay Raut: राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
Ratnagiri: अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
अजस्त्र लाटांमध्ये जायचं धाडस केलं, आतच अडकले, लाटा खेचू लागल्या, अशी झाली मृत्यूच्या दाढेतून सूटका
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
कुर्ला बस अपघातानंतर बाप मदतीला धावला; अचानक हाती मुलाचाच मृतदेह आला, अंगावर काटा आणणारा क्षण!
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
Kurla Bus Accident: 15 सेकंदांत 70चा स्पीड, ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय अन्...; कुर्ल्यातील अपघातानं क्षणार्धात होत्याचं झालं नव्हतं
15 सेकंदांत 70चा स्पीड, ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय अन्...; कुर्ल्यातील अपघातानं क्षणार्धात होत्याचं झालं नव्हतं
Embed widget