Realme C67 5G Price: Realme C67 5G लाँच, 5000एमएएच बॅटरी आणि 50 MPकॅमेरा स्वस्तात मिळणार, जाणून घ्या किंमत!
स्मार्टफोन ब्रँड रियलमीचा Realme C67 5G फोन भारतात लाँच झाला आहे. हा एक पॉकेट-फ्रेंडली 5G फोन असेल. फ्लिपकार्टच्या माध्यमातून हा स्मार्टफोन ऑर्डर करता येणार आहे.
Realme C67 5G price : स्मार्टफोन ब्रँड रियलमीचाRealme C67 5G फोन भारतात लाँच झाला आहे. हा पॉकेट-फ्रेंडली 5G फोन असेल. फ्लिपकार्टच्या माध्यमातून हा स्मार्टफोन ऑर्डर करता येणार आहे. मोबाइल फोनचे डिझाइन Realme Narzo 60x 5G सारखेच आहे. यामध्ये तुम्हाला राऊंड मॉड्यूलमध्ये कॅमेरा सेटअप आणि 2 कलर ऑप्शन पाहायला मिळतील. जाणून घ्या किती असेल फोनची किंमत?
किंमत किती असू शकते?
माहितीनुसार, भारतात रियलमी हा फोन 4/128GB आणि 6/128 GB अशा 2 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करू शकतो. स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 13,499 रुपये आणि 14,999 रुपये असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये ऑर्डर करू शकाल.
फिचर्स नेमके कसे असतील?
Realme C67 5G च्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 6.72 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेटसह येईल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलप्रायमरी कॅमेरा आणि 2GB कॅमेरासह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनी फ्रंटमध्ये 8 MP कॅमेरा देऊ शकते.
Realme C67 5G मध्ये तुम्हाला 5000 एमएएचची बॅटरी मिळेल जी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. तसेच या बाजूला व्हॉल्यूम रॉकर बटनही असणार आहे. कंपनी रियलमी सी67 4 जी फोन लाँच करणार आहे ज्यात 108MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 108MP प्रोसेसर आणि 256 GBपर्यंत स्टोरेज पर्याय मिळेल. हे स्मार्टफोन 19 डिसेंबररोजी इंडोनेशियात लाँच केले जाणार आहेत.
Realme GT5 pro : टच नाही, तर आता हाताच्या इशाऱ्यावर चालणारा फोन
चिनी स्मार्टफोन ब्रँड Realme ने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT5 pro स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनमध्ये 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत 40,000 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 12 जेस्चर कंट्रोलचा सपोर्ट मिळतो, जो फोनच्या UI आणि काही सोशल मीडिया अॅप्सवर काम करतो. म्हणजेच स्मार्टफोनला हात न लावता तुम्ही हाताच्या इशाऱ्याने चालवू शकता. हा मोबाईल कसा काम करतो? याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ सध्या टेक्नोसॅव्ही तरुणांमध्ये चांगलाच चर्चिला जात आहे.
इतर महत्वाची बातमी-