iPhone च्या Dynamic Island डिझाइनसह लॉन्च झाला Realme C55, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Realme C55 : Realme ने आज आपला नवीन स्मार्टफोन Realme C55 लॉन्च केला आहे. Realme C55 हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे, जो iPhone 14 Pro च्या Dynamic Island सारख्या फीचर्ससह येत आहे.
Realme C55 : Realme ने आज आपला नवीन स्मार्टफोन Realme C55 लॉन्च केला आहे. Realme C55 हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे, जो iPhone 14 Pro च्या Dynamic Island सारख्या फीचर्ससह येत आहे. कंपनीने याला मिनी कॅप्सूल असे नाव दिले आहे. जर या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, फोनच्या डिस्प्लेमध्ये एक पंच-होल कटआउट देण्यात आला आहे. जो चार्जिंग, बॅटरी फुल सारख्या नोटिफिकेशन्ससह डायनॅमिक आयलंड सारखा आहे. या फोनमध्ये कंपनीने किती mAh ची बॅटरी दिली आहे, यात ग्राहकांना किती MP चा कॅमेरा मिळेल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ...
Realme C55 चे स्पेसिफिकेशन
- ऑपरेटिंग सिस्टम: Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आधारित Realme UI कस्टम स्किन
- डिस्प्ले: 6.72-इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले
- प्रोसेसर: MediaTek Helio G88 प्रोसेसर
- RAM आणि स्टोरेज: 8GB RAM आणि 256GB स्टोरेज पर्यंत
- बॅटरी: 5,000mAh बॅटरी
- चार्जिंग: 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग
- कनेक्टिव्हिटी: 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस
Realme C55 च्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोनच्या पुढील भागात पंच-होल कटआउट देण्यात आला आहे. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या समोर 8MP कॅमेरा आहे. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. डिव्हाइसमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि स्पीकर ग्रिल देखील आहे.
Realme C55 ची किती आहे किंमत?
हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे, मात्र तो लवकरच भारतासोबत इतर देशांमध्येही लॉन्च केला जाईल. Realme C55 ची किंमत RP 2,499,000 (सुमारे 13,300 रुपये) आहे. ही किंमत फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Rp 2,999,000 (सुमारे 16,000 रुपये) आहे.
iPhone 4SE पुढील वर्षी लॉन्च होऊ शकतो
Apple या वर्षाच्या अखेरीस iPhone 15 सीरीज लॉन्च करू शकते. यातच आणखी एक बातमी समोर आली आहे, अॅपल पॉकेट फ्रेंडली आयफोनवर काम करत आहे, जो कंपनी पुढच्या वर्षी लॉन्च करू शकते. या बजेट आयफोनचे नाव iPhone SE4 असू शकते.
इतर बातमी:
Poco X5 Pro नंतर लवकरच POCO X5 होणार लॉन्च, पॉकेट फ्रेंडली असेल किंमत