PM Modi Bill Gates Live : आमच्याकडे बाळ 'आई' आणि 'AI' दोन्ही म्हणतं! एआयवर बोलताना मोदींच्या बिल गेट्सशी मनमोकळ्या गप्पा, म्हणाले..
PM Modi Bill Gates Live : मला तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवायचं आहे. याशिवाय शेतीचे आधुनिकीकरण करायचं आहे. बिल गेट्स यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Modi Bill Gates Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्यातला संवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून (AI) टेक्नॉलॉजी (Technology), आरोग्य सेवा, हवामान बदल आणि ड्रोनच्या वापरामध्ये महिलांचा वाढता सहभाग यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी, पंतप्रधानांनी एआय टेक्नॉलॉजीचा उल्लेख मराठी भाषेशी कसा संलग्न आहे हे देखील अगदी रंजकपणे सांगितलं आहे.
पीएम मोदींनी आई आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा उल्लेख केला
या मुलाखती दरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्तचा झाली. यामध्येच, पंतप्रधान मोदी बिल गेट्स यांना एक गंमत सांगताना म्हणाले की, आमच्या देशात आईला आई (I) म्हणतात. लहान मूल जन्माला आल्यानंतर तो आई (I) सुद्धा म्हणतो आणि ए आई (AI) सुद्धा म्हणतो ही भाषेतली गंमत आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतात होत असलेल्या टेक्नॉलॉजीतील बदलांवर अगदी मनमोकळेपणाने चर्चा केली. तसेच, मोदींनी त्यांच्या भविष्यातील त्यांच्या ध्येयाबाबतही सांगितले. मला तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवायचं आहे. असं मोदी म्हणाले. याशिवाय शेतीचे आधुनिकीकरण करायचं आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, G20 हे अॅप एकमेकांशी, जनतेशी संवाद साधण्यासाठी कसं उपयुक्त आहे. वेगवेगळ्या भाषांचा टेक्नॉलॉजीमध्ये वापर करून कसा संवाद साधता येऊ शकतो यावरही चर्चा झाली. तसेच, नमो अॅपचा उल्लेखही आवर्जून करण्यात आला.
पंतप्रधानांनी महिलांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख केला
यापूर्वी, एएनआयशी बोलताना बिल गेट्स यांनी भारतात एआयवर सुरू असलेल्या कामाची प्रशंसा केली होती. दरम्यान, पीएम मोदींनी बिल गेट्स यांच्याशी संवाद साधताना त्यांचे सरकार महिलांचे जीवन सुधारण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर कसा करतायत हे देखील सांगितले.
पीएम मोदी म्हणाले, "ज्या महिलांना सायकल कशी चालवायची हे माहित नव्हते त्या आज ड्रोन पायलट बनत आहेत. नमो ड्रोन दीदी उपक्रम हा पंतप्रधानांचा विशेषत: ग्रामीण भागातील महिलांसाठी एक मोठा उपक्रम आहे. भारताच्या हवामानावर बोलताना पंतप्रधान मोदींनी परिचय करून दिला. या दरम्यान पीएम मोदींनी बिल गेट्स यांना पीएमच्या नमो ॲपचा वापर करून सेल्फी घेण्यास सांगितले आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल देखील सांगितले.
पाहा व्हिडीओ :
PM Narendra Modi says, "If such a good thing (AI) is given to someone without proper training, it is likely to be misused...I suggested that we should start with clear watermarks on AI-generated content. So that nobody is misguided...In a democratic country like India, anybody… https://t.co/RslTuTrwHE pic.twitter.com/6VK0WuwF4R
— ANI (@ANI) March 29, 2024
महत्त्वाच्या बातम्या :