एक्स्प्लोर

UPI Apps : Gpay, Paytm आणि Phonepe वापरणाऱ्या 90 टक्के लोकांना पेमेंटची 'ही' सोपी ट्रिक माहित नाही, तुम्हाला माहित आहे का?

Gpay, Paytm आणि Phonepe अॅप वारंवार उघडताना आणि बंद करताना आपल्या सर्वांना त्रास सहन करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला ही समस्या टाळण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत.

UPI Apps : आपण सर्व UPI  App वापरत असाल. जीपे, पेटीएम आणि फोनपे सोबत 3 यूपीएआय अॅप्स भारतात (Online payment) खूप लोकप्रिय आहेत. हे अ ॅप्स वापरताना तुमच्या सगळ्यांना एक प्रॉब्लेम आला असेल की जेव्हा तुम्ही दुकानात किंवा स्टोअरमध्ये क्यूआर कोडने पेमेंट करायचं ठरवता तेव्हा तुम्हाला हे अॅप्स पुन्हा पुन्हा उघडून पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही दिवसातून 10 वेळा यूपीआय अॅप्स वापरत असाल तर क्यूआर कोडद्वारे किमान 7 ते 8 पेमेंट केले जाते. अॅप वारंवार उघडताना आणि बंद करताना आपल्या सर्वांना त्रास सहन करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला ही समस्या टाळण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत.

फॉलो करा ही ट्रिक-

यूपीआय अ ॅप्स वारंवार उघडू नयेत यासाठी तुम्हाला या अॅप्सचा क्यूआर स्कॅनर शॉर्टकट होमस्क्रीनवर ठेवावा लागेल. यासाठी तुम्हाला कोणतेही यूपीआय अॅप बराच वेळ प्रेस करुन ठेवावा लागेल. यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसू लागतील, त्यापैकी एक पर्याय असेल 'Scan ANy QR code'. या पर्यायावर टॅप करा आणि होमस्क्रीनवर ड्रॅग  करा. असे होईल की तुम्ही इथून थेट कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरू शकाल. म्हणजेच तुम्हाला आता अॅप ओपन करायची गरज नाही. तुम्ही शॉर्टकटवर क्लिक करुन पेमेंट करु शकाल.

मात्र, यूपीआय अॅपमध्ये पासवर्ड असेल तर शॉर्टकट उघडण्यापूर्वी पासवर्ड टाकावा लागतो, तसेच तो बंद असल्यास कॅमेऱ्याची परवानगी द्यावी लागते. त्याचप्रमाणे अॅपशी संबंधित होमस्क्रीनवर तुम्ही इतर शॉर्टकट जोडू शकता. जसे की मोबाइल रिचार्ज, पैसे पाठवणे, बॅलन्स आणि हिस्ट्री वगरे. यामुळे तुमचं पेमेंट सोपं होईल आणि त्रासही वाचेल. 

चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास काय कराल?

तुम्ही घाईघाईत चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर केले असल्यास, सर्वप्रथम तुम्हाला GPay, PhonePe, Paytm किंवा UPI अॅपच्या कस्टमर केअर सपोर्टला कॉल करून माहिती द्यावी लागेल. तुम्ही कोणत्या चुकीच्या UPI आयडीने चुकून किती पैसे ट्रान्सफर केले हे तुम्हाला सांगावे लागेल.

NPCI (National Payments Corporation of India) पोर्टलवर तक्रार कशी करावी?
UPI अॅपच्या कस्टमर केअर सपोर्टकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यास तुम्ही NPCI पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता.

अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवा

- सर्व प्रथम NPCI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- येथे तुम्हाला What we do नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या पेजवरील UPI वर क्लिक करा.

- नंतर Dispute Redressal Mechanism वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तक्रार विभाग दिसेल
- आता तुम्हाला व्यवहाराचे स्वरूप निवडावे लागेल.
 - आता तुम्हाला इश्यू सेक्शनमध्ये "Incorrectly transferred to another account" निवडावे लागेल. यासोबतच तुम्हाला सर्व माहिती नीट भरून तुमची तक्रार नोंदवावी लागेल.

इतर महत्वाची बातमी-

Gmail  Storage : प्रमोशनल Mails मुळे कंटाळला आहात? 'ही' ट्रिक वापरा अन् प्रमोशनल Mails ची चिंता विसरा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलंDmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत सरकारने कोणते 12 महत्त्वाचे निर्णय घेतले?
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Embed widget