(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mobile Charger Care Tips : Smartphone च्या चार्जरचा देखील होऊ शकतो स्फोट; तुमच्या चार्जरवर हे Symbols आहेत का?
Mobile Charger Care Tips : कित्येकदा स्मार्टफोन चार्ज करत असताना स्फोट झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की केवळ फोनच नाही तर चार्जरचा देखील स्फोट होऊ शकतो.
Mobile Charger Care Tips : आपण सर्वं स्मार्टफोन (Mobile) हे दररोज वापरतो. बऱ्याचदा (Smartphone) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच स्मार्टफोनला चिकटलेले असतात. या शिवाय काही लोक तर फोन चार्जिंग करत असताना देखील स्मार्टफोनचा वापर करत असतात. कित्येकदा स्मार्टफोन चार्ज करत असताना स्फोट झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की केवळ फोनच नाही तर चार्जरचा देखील स्फोट होऊ शकतो. जर तुम्ही लोकल चार्जर वापरत असाल तर त्या मध्ये या 3 गोष्टी देखील लक्षात घ्या.
चार्जरवर स्वेअर चिन्ह आहे का पाहा?
जर तुम्ही तुमच्या चार्जरकडे नीट बघितले तर, तुम्हाला त्यावर एक स्वेअर चिन्ह दिसेल. हे चिन्ह चार्जरच्या आतील तारा खूप चांगल्या वापरल्या आहेत आणि या चार्जरमुळे कोणालाही करंट लागणार नाही,असा या चिन्हाचा अर्थ होतो. जर तुमच्या चार्जरवर असे कोणतेही चिन्ह नसेल तर तुम्हाला चार्जरमधून विजेचा करंट लागू शकतो. तसेच व्होल्टेज जास्त असल्यास आग लागण्याचीसुद्धा शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही लोकल चार्जर वापरत असाल तर तो चेक करू घ्या.
होम साइन आहे का पाहा?
तुम्ही बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमचा फोन चार्ज करत असतात तेव्हा ही सावधगिरी बाळगावी, बस किंवा ट्रेनमध्ये चार्जिंग पॉईंटवर तुमचा अॅडॉप्टर सपोर्ट करतो की नाही ते तपासा. जर चार्जरवर होम चिन्ह असेल तर त्याचा चार्जर ट्रेनमध्ये कधीही वापर करू नका. जर तुम्ही तसाच वापरल्यास केल्याने फोन खराब होऊ शकतो.
Ampere तपासा
चार्जर किती Ampere चा आहे हे देखील तपासा. जर तुमच्या चार्जरमध्ये जास्त Ampere असतील तर तो चांगल्या दर्जाचा चार्जर आहे. तसेच काही चार्जरवर 8 चे चिन्ह असतात, हे चिन्ह आहे की नाही हे देखील तपासा. हे चिन्ह केवळ चांगल्या क्वालिटी चार्जरवर असतं याशिवाय तुम्ही BIS केअर अॅपद्वारे चार्जरची क्वालिटी देखील समजून घेऊ शकतात.
बनावट/ लोकल चार्जर युज करू नका
लोकल चार्जर वापरून स्मार्टफोन चार्ज करत असाल तर असे करू नका. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी ही खराब होते. कालांतराने बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. लोकल चार्जरमधील पॉवर सतत चढ-उतार होत राहतो, ज्यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीवर दबाव येतो आणि त्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. या मुळे फोनचा फक्त मूळ चार्जर वापरा.
इतर महत्वाची बातमी-