Android Phone Selling Tips : जुना Android फोन विकताय? थांबा, 'या' गोष्टी आधी डिलीट करा!
जुन्या Android फोनमध्ये अशी अनेक माहिती असते, ज्यामुळे तुमचं आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अँड्रॉइड फोन बदलताना जुन्या फोनचं काय करायचं याची माहिती आम्ही सांगणार आहोत.
Android Phone Selling Tips : अँड्रॉइड (Android) फोन अनेक किंमतीत येतात, हे स्मार्टफोन iOS फोनपेक्षा खूप स्वस्त देखील असतात. त्यामुळे युजर्स आपला अँड्रॉइड फोन दोन वर्षांत खराब झाला नसला तरी तो बदलतात. जर तुम्हीही असं काही करत असाल तर तुम्ही सावध व्हा, कारण तुमच्या जुन्या Android फोनमध्ये अशी अनेक माहिती असते, ज्यामुळे तुमचं आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अँड्रॉइड फोन बदलताना जुन्या फोनचं काय करायचं याची माहिती आम्ही सांगणार आहोत.
Delete Banking And UPI Accounts बँकिंग आणि यूपीआय अॅपचे काय करावे?
जर तुम्ही तुमच्या जुन्या फोनमध्ये बँकिंग आणि यूपीआय अ ॅप्स डाऊनलोड केले असतील आणि तुम्ही ते वापरत असाल तर तुम्ही तुमचा फोन बदलताना ते डिलीट करावेत. कारण जर कोणी तुमचा जुना फोन वापरत असेल तर या अॅप्सच्या माध्यमातून तुमची आर्थिक माहिती त्याच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.
Delete Phone Memory Data : सिम आणि डेटाचं काय करायचं?
आपला जुना फोन रिप्लेस करताना त्यातील सिमकार्ड काढून टाकावे. तसेच स्मार्टफोनमधून सिम डेटा डिलीट करावा. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते. मोबाईल मेमरीमध्येही अनेकदा आपण फोटो व्हिडीओ आणि नंबर्सदेखील फोनमेमरीमध्ये सेव्ह होतात. त्यामुळे मोबाईल सोपवायच्या आधी मोबाईल रिसेट किंवा फॉरमॅट करायला विसरु नका.
Whatsapp data Backup : व्हॉट्सअॅप डेटाचा बॅकअप घ्यायला विसरू नका
अँड्रॉइड फोन बदलण्यापूर्वी आपण आपले व्हॉट्सअॅप अकाउंट बॅकअप घेणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमच्या व्हॉट्सअॅपमधील माहिती नव्या अँड्रॉइड फोनमध्ये ट्रान्सफर होईल. बॅकअप घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या जुन्या फोनमधील व्हॉट्सअॅप डेटा डिलीट करावा. whatsapp मध्ये आपली वैयक्तिक माहिती असते. चॅट्स असतात. त्यासोबतच बाकी फोटोदेखील असते. त्यामुळे बॅकअप नक्की घ्या.
Factory Reset : फॅक्टरी रिसेट करा
जुना अँड्रॉइड फोन बदलल्यानंतर तुम्ही तुमचा जुना फोन फॅक्टरी रिसेट करा. असं केल्यानं तुमच्या जुन्या फोनमधील सर्व डेटा आपोआप डिलीट होईल. त्याचबरोबर फॅक्टरी रिसेट सेटिंगवर कोणी जुना फोन वापरला तर कोणतीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही.
इतर महत्वाची बातमी-