Tata Motors : व्यावसायिकांची चिंता मिटली! टाटा मोटर्सकडून नवीन Intra V70 pickup, Intra V20 Gold pickup अँड Ace HT+ लाँच
टाटा मोटर्सने नवीन इन्ट्रा व्ही 70, इन्ट्रा व्ही 20 गोल्ड आणि एस एचटी+ च्या लाँचची घोषणा केली. ही वाहनं मालवाहतूक सोपी आणि सोयीस्कर करणार आहे.
Tata Motors : टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने सुरूवातीपासून वाहन क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली आहे. त्यातच आता नवीन इन्ट्रा व्ही 70, इन्ट्रा व्ही 20 गोल्ड आणि एस एचटी+ च्या (Intra V70 pickup, Intra V20 Gold pickup and Ace HT+) लाँचची घोषणा केली. ही नवीन वाहने उत्तम उत्पन्नासह लांबच्या अंतरापर्यंत जास्त पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आली असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय वाहने इन्ट्रा व्ही 50 आणि एस डिझेलचे सुधारित व्हर्जन्स देखील लाँच केले. ही वाहनं मालवाहतूक सोपी आणि सोयीस्कर करणार आहे. त्यासोबतच बजेटफ्रेंडलीदेखील असल्याचं बोललं जात आहे. या वाहनांसाठी बुकिंग्ज देशभरातील सर्व टाटा मोटर्स सीव्ही डिलरशिप्समध्ये सुरू आहेत.
'ही वाहनं व्यावसायिकांसाठी उपयोगाची आहे. त्यासोबतच या वाहनांच्या माध्यामातून अनेक लहान व्यावसायिक आपला उदर्निर्वाह करु शकणार आहेत. लोकांच्या मोठ्या मागणीतून ही वाहनं डिझाईन करुन लाँच करण्यात आलेली आहेत. लांबच्या अंतरापर्यंत जास्त पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. सध्या सगळीकडे ई-कॉमर्स क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे मालवाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी अनेक नागरिक या नव्या व्यावसायात उतरण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यांच्यासाठी ही वाहनं उत्तम आणि कमी बजेटमध्ये असल्याने अनेकांच्या पसंतीत पडणारे आहेत. शिवाय अनेक स्टार्टअपसाठी देखील ही वाहनं कामात येऊ शकणारी आहे', असं टाटा मोटर्सकडून सांगण्यात आलं आहे.
ही वाहनं मजबूत आणि चांगल्या प्रतीची तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच नवे फिचर्सदेखील या वाहनांमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना या वाहनांचा चांगला फायदा होऊ शकतो. टाटा कंपनी सारखी मोठी कंपनी, कार्यक्षम फ्लीट मॅनेजमेंटसाठी आधुनिक टेलिमॅटिक्स प्रणाली,फ्लीट एजचे फायदे,अॅन्युअली मॉनिटरींग, हाय अपटाईम या सर्वांचा समावेश आहे. ग्राहकांची विश्वसार्हता जपणे आणि त्यांना चांगल्यातली चांगली सेवा देणे हे काम टाटा मोटर्सकडून मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे.
Intra V70 फिचर्स
-Highest rated payload: 1700kg
-Powered by 1.5L diesel engine with 220Nm torque
-Longest load body of 2960mm
Intra V20 Gold फिचर्स
-Maximum range of over 800km
-Highest rated payload capacity of 1200kg
-lass leading load body length of 2690mm
Ace HT+ फिचर्स
-High payload capacity of 900kg
-Reliable 800cc diesel engine with 35bhp power and 85Nm torque
-Longest deck length in segment
इतर महत्वाची बातमी-
2024 Renault Duster: New Generation Renault Duster चे फिचर्स लीक, कशी असेल नवी Renault Duster?