Laptop : मायक्रोसॉफ्टच्या 'या' निर्णयाने दोन वर्षात तुमचा लॅपटॉप भंगारात जाणार; जाणून घ्या कारण
Microsoft Windows 10 Support : दोन वर्षानंतर तुमचा लॅपटॉप भंगारात जाऊ शकतो. मायक्रोसॉफ्टच्या एका निर्णयाचा तुम्हाला फटका बसू शकतो.
Windows 10 Support : बहुतांशीजण लॅपटॉपचा (Laptop) वापर करतात. लॅपटॉपचा वापर ही सध्या सर्वसामान्य बाब झाली आहे. तुम्हीदेखील लॅपटॉप (Laptop) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दोन वर्षानंतर तुमचा लॅपटॉप भंगारात जाऊ शकतो. मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) एका निर्णयाचा तुम्हाला फटका बसू शकतो. 14 ऑक्टोबर 2025 पासून विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमचा (Windows 10 Support) सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे 24 कोटींच्या आसपास लॅपटॉप, पीसी मोडीत निघणार आहेत. तुमच्याकडेही याच र्व्हजनचा पीसी असेल तर तो काम करणे थांबवेल.
भविष्यातील अपडेट्स न मिळाल्याने अनेक युजर्सचे लॅपटॉप पूर्णपणे भंगार बनतील. मायक्रोसॉफ्ट पुढील 12 महिन्यांत विंडोज सपोर्ट बंद करणार आहे. हे Windows PC साठी समस्या निर्माण करू शकते. भविष्यातील अपडेट्स उपलब्ध होणार नाहीत. या स्थितीत पीसी असणे म्हणजे ते ई-वेस्टमध्ये रूपांतरित करण्यासारखे आहे. सुमारे 240 दशलक्ष पीसी निरुपयोगी झाल्याने सुमारे 480 दशलक्ष किलोग्रॅम ई-कचरा (E-Waste) तयार होण्याची भीती आहे.
मायक्रोसॉफ्ट आपल्या विंडोज 11 सपोर्टवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. यामुळे, लाखो पीसी नवीन व्हर्जनसाठी पात्र नसणार. कंपनीने Windows 10 सपोर्ट 2028 पर्यंत वैध ठेवण्यास सांगितले होते. परंतु हे केवळ सशुल्क सेवेसह उपलब्ध असणार आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत, त्यांना Windows 10 च्या विस्तारित व्हर्जनसाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. Windows 11 आणि भविष्यातील व्हर्जनसाठी निश्चितच थोडा वेळ लागणार आहे.
ई-कचरा ठरेल मोठी समस्या
जर असे झाल्यास, ई-कचरा ही सरकारसाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे. हा त्रास जगभरातील लोकांसाठी असणार आहे. त्यामुळेच अनेक मोठे ब्रँड आता पुनर्वापर केलेल्या साहित्यावर काम करणार आहेत.