(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Metro Card WhatsApp Recharge: आता व्हॉट्सॲपवरूनही मेट्रो कार्ड रिचार्ज होणार, घरबसल्याच होईल काम
Metro Card Recharge : मेट्रोकडून नवी सुविधा सुरु करण्यात आली असून तुम्ही व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या (WhatsApp Chatbot) माध्यमातून मेट्रोच्या अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता.
Metro Card Recharge From Whatsapp : लोकल ट्रेनप्रमाणेचा आता मेट्रोने (Metro) प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये दररोज लाखो लोक मेट्रोने प्रवास करतात. अशा परिस्थितीत त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन नवनवीन बदल करत असते. मेट्रोमध्ये प्रवास करताना, मेट्रो कार्ड रिचार्ज आणि टोकन मिळण्याची सर्वात मोठी समस्या आहे. गर्दीमुळे लांबच लांब रांगेत उभे राहावं लागतं आणि यात खूप वेळ वाया जातो. पण, आता तुमची यातून सुटका होणार आहे कारण आता तुम्ही फक्त व्हॉट्स ॲपवरूनच मेट्रो तिकीट बुक, रिचार्ज किंवा रद्द करू शकणार आहात. मात्र, देशातील केवळ चार शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
आता व्हॉट्सॲपवरूनही मेट्रो कार्ड रिचार्ज होणार
मेट्रोकडून नवी सुविधा सुरु करण्यात आली असून तुम्ही व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या (WhatsApp Chatbot) माध्यमातून मेट्रोच्या अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता. WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मवर ट्रान्झिट सोल्युशन्स आणण्यासाठी WhatsApp ने भारतीय शहरांमधील मेट्रो रेल्वे सेवा प्रोव्हायडर्ससोबत करार केला आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना आता रांगेत उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. तुम्ही व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे सहजपणे मेट्रोचं तिकिटं काढू शकता किंवा मेट्रो कार्ड रिचार्ज करू शकता. याशिवाय तुम्हाला मेट्रोचे टाइम टेबल, रूट मॅप, भाडे आणि इतर माहितीही व्हॉट्सॲप चॅटबोटवर मिळेल.
'या' 4 शहरांमध्ये सुविधा सुरू
सध्या व्हॉट्सॲप चॅटबॉटची सुविधा फक्त चार शहरांमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद मेट्रोचा समावेश आहे. या चार शहरांतील युजर्स व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे तिकीट काढू किंवा कार्ड रिचार्ज करू शकतात.
मेट्रो कार्ड रिचार्जसाठी व्हॉट्सॲपचा वापर कसा कराल?
- तुम्हाला आधी व्हॉट्सॲप चॅटबॉट सक्रिय करावं लागेल. एकदा व्हॉट्सॲप चॅटबॉट सक्रिय झाल्यानंतर, तुम्हाला ई-तिकीट बुक करण्यासाठी एक URL मिळेल.
- बंगळुरूमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना https://wa.me/+918105556677 या लिंकवर जाऊन चॅटबॉट सक्रिय करावं लागेल. या लिंकवर क्लिक करून हाय लिहून संदेश पाठवा.
- मुंबईत ऑटोमेटेड फेअर कलेक्शन (एएफसी) गेटवर ई-तिकिटांची पडताळणी करावी लागेल.
- पुणे आणि हैदराबादसाठी तुम्हाला https://wa.me/+918105556677 वर हाय पाठवावे लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :