Mumbai Metro: मुंबई मेट्रोच्या गुंदवली ते दहीसर मार्गावर एकाच महिन्यात 44.26 लाख प्रवाशांची नोंद, पहिल्या आठवड्यात 1.40 लाख प्रवाशांचा प्रवास
Mumbai Metro: दहिसर ते गुंदवली (अंधेरी पूर्व) दरम्यान धावणाऱ्या मेट्रोमधून पहिल्याच आठवड्यात 1.40 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचं केल्याची नोंद आहे.
Mumbai Metro Line 2A: दहिसर आणि गुंदवली (अंधेरी पूर्व) दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 मध्ये अवघ्या एका महिन्या 44.26 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्धाटन 23 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पहिल्याच आठवड्यात या मेट्रोतून 1.40 प्रवाशांनी प्रवास केला होता.
रायडरशिप डेटानुसार, मेट्रो लाईन्स 2A आणि 7 या दोन्ही मार्गांवर दररोज सरासरी प्रवाशांची संख्या जवळपास 1.47 लाख आहे. तसेच या मार्गावर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत आहे. धनुकरवाडी स्थानकातून सकाळी 5.25 वाजता मेट्रो सेवा सुरू होते आणि शेवटची ट्रेन दहिसर पूर्वेकडून रात्री 11.11 वाजता सुटते.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL) दिलेल्या माहितीनुसार मेट्रो लाईन 7 वरील गुंदवली आणि मागाठाणे आणि मेट्रो लाईन 2A वरील अंधेरी पश्चिम, दहिसर पूर्व आणि आनंद नगर येथे इतर स्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक प्रवासी संख्या वाढली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने बांधलेल्या एलिव्हेटेड मेट्रो लाईन 2A आणि 7 ने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वरील वाहनांची रहदारी 25 टक्क्यांनी कमी करणे आणि ट्रेनचा भार 15 टक्क्यांनी कमी करणे हा या मेट्रो सुरु करण्यामागचा उद्देश होता. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल.
एकूण 17 स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रो लाईन 2A चा प्रवास वेळ 40 मिनिटे इतका आहे तर 13 स्थानके असलेल्या लाईन 7 साठी प्रवास वेळ 35 मिनिटे इतका आहे. सध्या मेट्रो 70 किमी प्रतितास वेगाने धावते. 2 मेट्रो कॉरिडॉरवर पीक हवरमध्ये आठ मिनिटांच्या अंतराने आणि कमी वेळेत 10 मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा सुरु आहे.
गुंदवली-दहिसर मेट्रोच्या रात्रीच्या वेळेत वाढ
महामुंबई मेट्रोच्या 'मेट्रो 2 A' आणि 'मेट्रो 7' वरील मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या मेट्रो लाईनवरून शेवटची मेट्रो रात्री 10.09 ऐवजी 10.30 वाजता सुटणार आहे. मेट्रो लाइन 2A आणि 7 येथे रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी सुटणाऱ्या शेवटच्या ट्रेनची वेळ रात्री 10.30 पर्यंत वाढवण्यासाठी दोन्ही मार्गांवर दोन अतिरिक्त सेवा सुरू केल्या जाणार आहेत.
Mumbai Metro 2A and 7: रात्री या वेळेवर धावणार मेट्रो:
1. अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व 22.20 आणि 22.30 वाजता. (दोन सेवा)
2. गुंदवली ते डहाणूकरवाडी मार्गे दहिसर पूर्व 22.20 आणि 22.30 वाजता. (दोन सेवा)
फेज-2 कार्यान्वित झाल्यानंतर सेवांची संख्या आणि प्रकल्प लाईनच्या पूर्ण लांबीपर्यंत वाढ झाली आहे.
Mumbai Metro 2A and 7: विविध गंतव्यस्थानांसाठी शेवटच्या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
• गुंदवलीहून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची ट्रेन – 21:30 वा.
• गुंदवलीहून डहाणूकरवाडीसाठी शेवटची ट्रेन – 22:30 वा.
• गुंदवलीसाठी अंधेरी पश्चिमेकडून शेवटची ट्रेन – 21:30 वा.
• अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेसाठी शेवटची ट्रेन – 22:30 वा.
• दहिसर पूर्वेकडून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची ट्रेन – 22:03 वा.
• दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी शेवटची ट्रेन – 22:08 वा.
• डहाणूकरवाडीसाठी दहिसर पूर्वेकडून शेवटची ट्रेन – 23:11 वा.