एक्स्प्लोर

AI Face-Swapping : AI च्या मदतीने 5 कोटींची फसवणूक! मित्राला मदत म्हणून पाठवली रक्कम, फेस स्वॅपिंग करून घातला गंडा

एका व्यक्तीसोबत डीपफेक टेक्नॉलीचा वापर करून तब्बत 5 कोटीची रूपये लंपास केले आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (Artificial Intelligence) टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर होतोय.

AI Face-Swapping Technology : आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) नं आपल्या कारनाम्यांनी जगाला चकित केलं आहे. जगभरात अनेकजण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) सर्रास वापर करत आहेत. मात्र, आता मदतीसाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर गैरकामांसाठी केला जात असल्याचं समोर आलं आहे. अलिकडेच चीनमधील एका व्यक्तीची एआयमुळे 5 कोटींची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना चीनमध्ये घडली असून त्यामुळे AI च्या वापरावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

चीनमधील बाओटो शहरात एका व्यक्तीची 5 कोटींची फसवणूक झाली आहे. डीपफेक तंत्राचा वापर करून मित्र असल्याची बतावणी करत 5 कोटींची मागणी केली. आपलाच मित्र आहे असं समजून त्या व्यक्तीनंही दुसऱ्याच कोणालातरी पैसे दिले. 

डीपफेक नेमके आहे काय?

अलिकडेच डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करून एका व्यक्तीची 5 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूकीची घटना चीनमधील आहे. यावरून टेक्नॉलॉजी किती प्रगत आहे हे लक्षात येतं. टेक्नॉलॉजीतील या वेगवान बदलांची अनेक लोकांना कल्पनाही नाही. लोकांना जर विचारलं की, डीपफेक टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर माहिती नाही? असंच उत्तर मिळेल. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ऑनलाईन फेक फोटोज आणि व्हिडीओ बनवले जाऊ शकतात. हे फोटो आणि व्हिडीओ बघितल्यानंतर अगदी हुबेहुब आपल्याच ओळखीची व्यक्ती आहे, असंच वाटतं. त्यामुळे एआय चॅटबॉटचा चुकीच्या गोष्टींचा प्रचार-प्रसार केला जाऊ शकतो. हे खूप धोकादायक आहे. 

AI च्या मदतीनं 5 कोटींना गंडा 

डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करुन लोक बनावट चित्र आणि व्हिडीओ वास्तव म्हणून दाखवतात. रॉयटर्सच्या अहवालानुसार, उत्तर चीनमधील एका व्यक्तीनं प्रगत डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तब्बल 5 कोटींना गंडा घातला. एका व्यक्तीला मित्र असल्याचं भासवत त्याच्याकडून तब्बल 5 कोटींची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती करुन घेतली. आरोपीनं AI च्या फेस-स्वॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आणि पीडित व्यक्तीच्या मित्राचं रुप धारण केलं. 

आपल्या मित्राला पैशांची नितांत गरज आहे, असं वाटल्यानं त्यानंही पैसे दिले, असं फसवणूक झालेल्या व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं. त्यानंतरही आपल्यासोबत फसवणूक झाल्याची जराशीही माहिती या व्यक्तीला नव्हती. त्यानंतर मैत्रिणीनं सत्य समोर आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं सदर व्यक्तीच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तरी, पोलिसांत धाव घेत घडल्या प्रकाराबाबत सदर व्यक्तीनं तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ तपासाची सूत्र हलवली. पोलिसांनी एकूण रकमेपैकी काही रक्कम परत मिळवली आहे. तसेच, उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

या घटनेमुळे आर्थिक गुन्ह्यांसाठी एआयसारख्या प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे चीनमधील लोकांची चिंता वाढली आहे. यावरून भारतातील लोकांनीही ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहायची आवश्यकता आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Artificial Intelligence : ChatGPT चे CEO Sam Altman यांच्याकडून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची चिंता व्यक्त, सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
×
Embed widget