ABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर संतप्त जमावाकडून तोडफोड.. जमावबंदी लागू, इंटरनेट सेवाही स्थगित...
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना तर अजित पवार ३ वाजता निघणार, शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी, शाह आणि नड्डांची घेणार सदिच्छा भेट
शिवसेनेच्या काही माजी मंत्र्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा, केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोडांना विरोध असल्याची सूत्रांची माहिती
काही खात्यांबाबत महायुतीत समन्वयाअभावी भाजपची यादीही लांबणीवर, दिल्लीतून अजूनही विचारणा नाही, संभाव्य मंत्र्यांचं टेन्शन वाढलं
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाला दिल्यास काँग्रेस विधानपरिषदेत दावा करणार, सूत्रांची माहिती
राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांना दिलं गुलाबाचं फूल, एनडीए खासदारांना गुलाब आणि तिरंगा देत संसद परिसरात काँग्रेस खासदारांची गांधीगिरी
सातारा जिल्हा न्यायाधीशाला पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक, पुणे-सातारा एसीबीची कारवाई, फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी
राहुरीच्या बहुचर्चित वकील दाम्पत्य हत्याकांडातील माफीच्या साक्षीदाराचा कोर्टात कबुलीजबाब, आज जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम घेणार उलट तपासणी