Maharashtra Superfast News : 11 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
सांगली तासगाव मार्गावरील कुमठे फाट्याजवळ वडाप आणि दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, वडाप चालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिल्याची महिती.
माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेस नेते संजय पांडेंची ठाण्यात चौकशी, खोट्या केसेसच्या धमक्या देऊन पैसे उकळल्याचा पांडे यांच्यावर आरोप, व्यावसायिक संजय पुनमिया यांनी केली होती तक्रार.
मोवाड नगरपरिषदेचे ५० टक्के कर्मचारी कागदोपत्री कामावर हजर, प्रत्यक्षात मात्र गैरहजर. काटोलचे आमदार चरण ठाकूर यांच्या पाहणी दौऱ्यात प्रकार उघड, बजावली कारणे दाखवा नोटीस.
कांद्यापाठोपाठ फळबाग लागवड पीकविमा उतरवण्यातही मोठा घोटाळा, राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये फळबाग लागवड क्षेत्र नसताना देखील विमा उतरवल्याचं समोर.
शरद पवारांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी.
अंबडमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या, आरोपीला कडक शिक्षा करावी या मागणीसाठी अंबडमधील नागरिक रस्त्यावर, बंद पाळत आणि मोर्चा काढून निषेध व्यक्त.
पाच दिवसांच्या बंदनंतर अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीत व्यवहार सुरु, २ दिवसांत ७ हजार क्विंटलहून अधिक सोयाबीनची खरोदी, सोयाबीनला ४ हजार ३०० रुपये भाव.
नवीन वर्षात सलूनचे दर २०-३० टक्क्यांनी वाढणार, महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय.