RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
RAW Agent Ravindra Kaushik : अल लाईफमध्ये रवींद्र कौशिक हे पाकिस्तानमध्ये पोस्टिंग केलेल्या भारताची गुप्तचर संघटना RAW एजंट होते. त्यांना अटक होईपर्यंत आणि कोठडीत मृत्यू होईपर्यंत ते गुप्तहेर राहिले.
RAW Agent Ravindra Kaushik : आपल्यापैकी बहुतेकांना हेरांच्या (गुप्तहेर) जीवनाबद्दल माहिती नसते कारण ते त्यांचे अर्ध्याहून अधिक आयुष्य गुप्तपणे घालवतात. हेर किंवा गुप्तहेरांचे जीवन धोक्याने भरलेले असते, ते पकडले जाऊ नये म्हणून कठोर परिश्रम घेतात आणि काही जण आपल्या देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देतात, पण ते लोकांच्या नजरेत क्वचितच येतात. मात्र, प्रेमाला मर्यादा नसतात आणि गुप्तहेर रवींद्र कौशिक यांची प्रेम कहाणी सुद्धा हेच सिद्ध करते. जर आपण बॉलीवूड चित्रपट 'राझी' पाहिला असेल ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये भारतासाठी काम करत असलेल्या गुप्तहेराच्या चित्रणावरुन तुम्हाला हे समजेल की एखाद्या गुप्तहेरला कोणत्या धोक्यांमधून जावे लागते. रिअल लाईफमध्ये रवींद्र कौशिक हे पाकिस्तानमध्ये पोस्टिंग केलेल्या भारताची गुप्तचर संघटना RAW एजंट होते. त्यांना अटक होईपर्यंत आणि कोठडीत मृत्यू होईपर्यंत ते गुप्तहेर राहिले.
रवींद्र कौशिक कोण होते आणि गुप्तचर कसे झाले?
रवींद्र कौशिक यांचा जन्म 11 एप्रिल 1952 रोजी राजस्थानमधील श्री गंगानगरमधील एका कुटुंबात झाला. त्यांना किशोरवयात थिएटर करायला आवडायचे आणि तो थिएटर करत असताना RAW ने त्यांच्यामधील हुशारी हेरली. जेव्हा तो 23 वर्षांचा होता, तेव्हा कौशिकला RAW ने भरती केले आणि नबी अहमद शाकीर नावाने एका विशेष मोहिमेवर पाकिस्तानात पाठवले. भारतातून त्यांचे सर्व रेकॉर्ड पुसले गेले. प्रशिक्षणादरम्यान, कौशिक उर्दूमध्ये पारंगत झाले आणि मुस्लिम धार्मिक ग्रंथ आणि पाकिस्तानच्या भूभागाशी ओळख झाली असे मानले जाते. पाकिस्तानात असताना त्यांनी कराची विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले. ते एक कमिशन्ड ऑफिसर झाले आणि नंतर त्यांना पाकिस्तानी सैन्यात मेजर पदावर बढती मिळाली. असे मानले जाते की 'द ब्लॅक टायगर' या नावाने त्यांनी 1978-1983 पर्यंत भारतीय संरक्षण दलांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. रवींद्र पाकिस्तानात वेगळं आयुष्य जगत होते.
भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडले होते. ती पाकिस्तानी आर्मी ऑफिसरची मुलगी होती. दोघे मित्र बनले आणि लवकरच लग्न झाले. रवींद्र कौशिक यांची पत्नी अमानत हिला रवींद्र गुप्तहेर आहे हे माहीत होते की नाही हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल? सूत्रांच्या माहितीनुसार, अमानतला लग्नानंतरही तिचा नवरा गुप्तहेर असल्याची माहिती नव्हती. या दोघांना अरीब अहमद खान नावाचा मुलगा होता.
रवींद्र कसे पकडला गेले?
RAW ने पाठवलेल्या आणखी एका एजंटने पाकिस्तानात त्याच्या चौकशीदरम्यान चुकून त्यांची माहिती दिल्याचे बोलले जाते. 1983 मध्ये त्यांना पकडण्यात आले आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर त्यांची शिक्षा कमी करून जन्मठेपेची झाली. 2001 मध्ये मृत्यू होईपर्यंत कौशिक पाकिस्तानच्या ताब्यात होते. पाकिस्तानी तुरुंगात असताना त्यांनी भारतात आपल्या कुटुंबाला गुप्त पत्रे लिहिली होती, असे वृत्त आहे. मात्र, भारत सरकारने त्यांना मान्यता दिली नाही. कौशिक यांचा सियालकोटमधील चौकशी केंद्रात दोन वर्षे अतोनात छळ करण्यात आला आणि त्यानंतर 16 वर्षे मियानवली येथे तुरुंगात ठेवण्यात आले. अहवालानुसार, 2001 मध्ये त्यांना फुफ्फुसाचा क्षयरोग आणि हृदयविकाराचे निदान झाले, पण त्यांना कोणीही मदत करू शकले नाही आणि न्यू सेंट्रल मुलतान जेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पत्नी आणि मुलाचे काय झाले?
उपलब्ध माहितीनुसार त्यांची पत्नी अमानत आणि त्यांच्या मुलाबद्दल कोणालाही माहिती नाही.
इतर महत्वाच्या बातम्या