(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gmail : इंटरनेटशिवाय वापरा जीमेल; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Offline Gmail : इंटरनेट शिवाय तुम्हाला जी-मेल वापरता येऊ शकते. त्यासाठी काही सोप्या पद्धती फॉलो करा.
Offline Gmail : अनेकदा इंटरनेट नसलेल्या ठिकाणी काम करावे लागते. त्यामुळे इंटरनेट अभावी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. अनेकांची कामे ई-मेलवरून होत असतात. इंटरनेट कनेक्शन नसल्याने अनेकांसाठी अडचणी निर्माण होतात. मात्र, तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय ऑफलाइन मोडमध्ये जी-मेल सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही ई-मेल पाठवणे ते मेल सर्च करण्याची सुविधा मिळते.
> एनेबल करा ऑफलाइन मेल
- सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर जीमेल ओपन करा. हा मोड इतर कोणत्याही ब्राउझरवर काम करणार नाही.
- यानंतर वरच्या उजव्या कोपर्यात सेटिंग्ज गियरवर क्लिक करा.
- यानंतर Settings हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुम्हाला ऑफलाइन टॅपवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर ऑफलाइन ईमेल बॉक्स चेकमार्क करा.
- त्यानंतर ऑनलाइन प्रवेशासाठी तुम्हाला किती दिवस ईमेल सिंक करायचे आहेत ते निवडा. ही सुविधा 90 दिवसांसाठी उपलब्ध आहे.
- सुरक्षेच्या कारणास्तव, तुम्हाला संगणकावर ऑफलाइन डेटा ठेवायचा आहे की हटवायचा आहे हे निवडावे लागेल.
- यानंतर Save Changes वर क्लिक करा.
>> ऑफलाईन असताना जीमेल अॅक्सेस कसा करणार?
- जेव्हा तुम्ही ऑफलाइन असाल तेव्हा क्रोम ब्राउजरवर mail.google.com वर क्लिक करा.
- यामध्ये तु्म्हाला ऑफलाइन मोडच्या मेसेज कन्फर्म करावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही आपल्या इनबॉक्स ब्राउझ करू शकाल. तुम्हाला मेसेज ड्राफ्ट करण्याची आणि मेसेज वाचण्याची सुविधाही मिळेल.
>> ऑफलाइन टीप्स्
- ऑफलाइन मोडमध्ये, तुम्ही ऑफलाइन सिंक केलेले तुमचे मेसेज शोधण्यात सक्षम असाल.
- मेलला अॅटेच असलेल्या फाईल्स डाउनलोड करू शकत नाही.मात्र, ते ऑफलाइन मोडमध्ये पाहिले जाऊ शकता.
>> 'या' सोप्या ट्रिक्स वापरुन Gmail Storage वाढवा
जर तुम्ही जीमेल युजर (Gmail) असाल तर तुम्हाला जीमेल स्टोरेज फुल्ल असा मेसेज अनेकदा आलाच असेल. जीमेलमध्ये स्टोरेज नसल्यानं अनेकदा महत्वाचा डेटा बॅकअप होत नाही. जीमेल फुल्ल असेल तर नवीन मेल मिळत नाही. त्यामुळे अनेकदा महत्वाचे मेल्स न आल्याने मोठी किंमत मोजावी लागू शकते.
स्टोरेज वाढवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा...
-सर्वप्रथम तुमचे जीमेल अकाऊंट उघडा.
-यानंतर टॉपमध्ये सर्च ऑप्शनवर जा.
-यानंतर टाईप करून सर्च करा has:attachment larger:10MB
-यानंतर 10MB पेक्षा जास्त स्टोरेज असलेले मेल तुमच्यासमोर येतील.
-तर 10MBपेक्षा जास्त स्टोरेज असलेले अनावश्यक मेल डिलीट करू शकता.
-यानंतर तुमचे जीमेल स्टोरेज रिकामे होईल.