Jio Brain : जिओने लॉन्च केला AI प्लॅटफॉर्म, 6G नेटवर्क विकसित करण्यासाठी होणार मदत
Jio Brain : Reliance Jio ने Jio Brain नावाचे नवीन AI प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. हे प्लॅटफॉर्म 6G विकसित करण्यासाठी देखील मदत करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : रिलायन्स जिओ (Jio) अनेक नव्या गोष्टी किंवा प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहे. यावेळी कंपनीने Jio Brain नावाने स्वतःचे AI प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा एक नवीन 5G इंटिग्रेटेड मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचे नाव Jio Brain आहे आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करते. Jio चे हे नवीन प्लॅटफॉर्म केवळ Jio वरच नाही तर Airtel आणि Vodafone-Idea नेटवर्कवर देखील काम करू शकते.
जिओ ब्रेन म्हणजे काय?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जिओची ही सेवा केवळ टेलिकॉम नेटवर्कवरच नाही तर कोणत्याही प्रकारच्या एंटरप्राइज नेटवर्क किंवा आयटी नेटवर्कवरही काम करते. याचा अर्थ Jio चे नेटवर्क कोणत्याही प्रकारच्या नेटवर्कशी कनेक्ट होऊन काम करू शकते. Jio च्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज असलेले हे विशेष तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म गेल्या दोन वर्षांत हजारो अभियंत्यांनी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आहे. Jio Brain 500 हून अधिक ॲप्ससह सुसज्ज आहे, ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ, मजकूर, दस्तऐवज आणि इतर अनेक कामे सुलभ करण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. याशिवाय, Jio, Jio Brain च्या या नवीन AI प्लॅटफॉर्मवर इन-बिल्ट AI अल्गोरिदम सारखी विशेष वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.
जिओ ब्रेन 6G विकसित करण्यात मदत करेल
या सर्वांशिवाय Jio कंपनीने आपल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल विशेष दावा केला आहे आणि 5G आणि 6G तंत्रज्ञान विकसित करण्यात जिओ ब्रेन महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे म्हटले आहे. कंपनीच्या मते, जिओ ब्रेन भविष्यातील नेटवर्क ऑप्टिमायझेशन आणि व्यवसायातील बदलांमध्ये खूप मदत करू शकते. याशिवाय, जिओ ब्रेनच्या मदतीने 6जी विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ देखील तयार केले जाऊ शकते.
जियो एअरफायबरचे तीन डेटा बूस्टर प्लान
जियो एअरफायबरचा पहिला डेटा बूस्टर प्लॅन 101 रुपयांचा आहे, ज्यामध्ये युजर्संना त्यांच्या बेस प्लॅनच्या त्याच स्पीडवर 100 जीबी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळतो.
जियो एअरफायबरचा दुसरा डेटा बूस्टर प्लॅन 251रुपयांचा आहे, ज्यामध्ये युजर्संना त्यांच्या बेस प्लॅनच्या स्पीडवरून 500 जीबी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळतो.
जियो एअरफायबरचा तिसरा डेटा बूस्टर प्लॅन 401 रुपयांचा आहे, ज्यामध्ये युजर्संना त्यांच्या बेस प्लॅनच्या त्याच वेगाने 1000 जीबी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळतो.
जियो एअर फायबरचे नवीन डेटा बूस्टर प्लॅन माय जिओ अॅप आणि Jio.com उपलब्ध आहेत आणि सर्व एअर फायबर ग्राहक हे प्लॅन वापरू शकतात. एअर फायबरमध्ये युजर्संना एकूण 6 प्लॅनचे ऑप्शन मिळतात. हे प्लान 599 रुपये, 899 रुपये, 1199 रुपये, 1499 रुपये, 2499 रुपये आणि 3999 रुपये आहेत.
ही बातमी वाचा :
Best Prepaid Plans: 28 दिवसांचा कोणता डेटा प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर