Best Prepaid Plans: 28 दिवसांचा कोणता डेटा प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर
Airtel आणि Jio या दोघांपैकी कोणती कंपनी बेस्ट डेटा प्लॅन ऑफर करते याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : स्मार्टफोन युजर्स त्यांच्या रिजार्ज प्लॅनमध्ये केवळ व्हॉइस कॉलिंग आणि इंटरनेट (Internet) डेटाच नाही तर OTT ॲप्सचे देखील सब्सक्रिप्शन देतात. यामुळे, देशातील सर्व टेलीकॉम कंपन्या अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये त्यांच्या युजर्सना इंटरनेट डेटासह OTT ॲप्सचे विनामूल्य सब्सक्रिप्शन देखील ऑफर करतात. जर तुम्हीही असाच रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला Airtel आणि Jio च्या अशाच काही प्लॅनविषयी माहिती देणार आहोत. त्याचप्रमाणे 28 दिवसांसाठी संपूर्ण डेटा आणि अनेक OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन कसे मिळू शकते याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊयात.
एअरटेलचा 28 दिवसांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, युजर्सना 28 दिवसांसाठी OTT ॲप्सच्या मोफत सब्सक्रिप्शनसह संपूर्ण प्लॅन खरेदी करण्यासाठी 499 रुपये खर्च करावे लागतील. एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, युजर्सना अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग, रोमिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 3GB इंटरनेट डेटासह अनेक विशेष फायदे मिळतात.या प्लॅनसह, युजर्सना अमर्यादित 5G डेटा, Airtel Extreme Play अंतर्गत 15 पेक्षा जास्त OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. (Sony LIV, Lionsgate Play, Fancode, Eros Now, Hoichoi, ManoramaMAX) डिस्नी प्लस हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी, अपोलो 24/7 सर्कल, विंक म्युझिक आणि 3 महिन्यांसाठी विनामूल्य हॅलोट्यून्स सुविधा देखील उपलब्ध होते.
जिओचा 28 दिवसांचा प्रीपेड प्लॅन
यामध्ये जिओचा 28 दिवसांचा प्लॅन हा तुम्हाला 398 रुपयांमध्ये मिळत आहे. जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, युजर्सना 28 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि इतर अनेक फायदे मिळतात. जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित 5G डेटा देखील मिळतो. याशिवाय युजर्सना Sony LIV, ZEE5, Jio Cinema Premium, Lionsgate Play, Discovery Plus यासह एकूण 12 OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
या दोन कंपन्यांच्या 28 दिवसांच्या सर्वोत्कृष्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅनची माहिती जाणून घेतल्यास, तुम्हाला समजले असेल की या दोन कंपन्यांपैकी कोणता प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी अधिक चांगला आहे. त्यामुळे या प्लॅनची निवड करताना तुम्हाला कोणत्या प्लॅमध्ये जास्त ऑफर्स मिळतात हे पाहणं फायदेशीर ठरु शकते. तसेच कोणता प्लॅन कमी किंमतीत तुमच्यासाठी उपलब्ध आहे, याची देखील सविस्तर माहिती मिळण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.