एक्स्प्लोर

iPhone : iPhone यूजर्सला मिळेल पूर्वीपेक्षा चांगला अनुभव! iOS 17 चे टॉप फीचर्स, जाणून घ्या 

iPhones मध्ये नवीन फीचर्स आणि अपग्रेड्स जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे यूजर्सना फोन, मेसेजेस आणि फेसटाइम अ‍ॅप्ससाठी नेहमीपेक्षा चांगला अनुभव मिळणार आहे.

iPhone : Apple कंपनीने त्यांच्या वार्षिक कार्यक्रम WWDC 2023 मध्ये iOS 17 चे चे सॉफ्टवेअर वर्जन लॉन्च केले आहे. यामध्ये कंपनीने नवीन iOS मध्ये अनेक बदल केले असल्याचे सांगण्यात आले. या बदलांसह, iPhones मध्ये नवीन फिचर्ससोबत विविध अपग्रेड देखील करण्यात आले आहे, ज्यामुळे फोन, मेसेजेस आणि फेसटाइम अ‍ॅप्सचा इंटरफेस पूर्वीपेक्षा चांगला झाला आहे. खास iPhone यूजर्ससाठी iOS 17 च्या नवीन अपडेटेड फीचर्सबद्दल माहिती जाणून घेऊयात..

भारतीय यूजर्ससाठी महत्वाची बातमी
बहुप्रतिक्षित iPhone 15 लवकरच लॉन्च होणार आहे, या स्मार्टफोनबाबत यूजर्स देखील खूप उत्सुक आहेत. या फोनमध्ये अनेक नवीन अपडेट्स अपेक्षित आहेत. मात्र iPhone 15 सोबत iOS 17 मध्ये अशी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, जी फक्त भारतीय यूजर्ससाठी लॉन्च करण्याची योजना आहे. तुम्ही देखील iPhone यूजर असाल किंवा हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. 

कीबोर्डमध्ये या भाषांना असेल सपोर्ट 
कंपनीच्या माहितीनुसार iOS 17 अपडेट विकसित करताना भारतीय यूजर्सना लक्षात ठेवण्यात आले आहे. यामध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजीच नव्हे तर अनेक प्रादेशिक भाषांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. याच्या कीबोर्डमध्ये ट्रांसलेशन फीचर जोडले गेले आहे. ज्यामुळे तुम्ही तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील कोणताही मजकूर वाचण्यास सक्षम असाल. यासोबतच उर्दू, पंजाबी आणि गुजराती भाषांचाही समावेश असल्याचा शक्यता आहे. दरम्यान, iOS 16 मध्ये हिंदी, बंगाली आणि मराठीचा समावेश करण्यात आला होता.

Apple Siri मध्ये हे खास फीचर्स
Apple Siri कडून एकूण 10 भाषांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तर याच्या कीबोर्डचा वापर Apple च्या iPad OS, macOS आणि watchOS डिवाईससाठी देखील तुम्ही वापरू शकता. यामुळे सिरी आता अधिक स्मार्ट बनवण्यात आली आहे. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलून उत्तरे घेता येतील.

रिंगटोन फीचर खूप खास
iOS 17 च्या नवीन अपडेटमधील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे रिंगटोन फीचर. यामध्ये वेगवेगळ्या सिमसाठी वेगवेगळे रिंगटोन सेट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय कॉन्टॅक्ट सेव्ह करताना केवळ नाव किंवा इमोजीच नाही, तर स्टिकर्स आणि फोटोही वापरता येणार आहेत. याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो स्टिकरमध्ये बदलू शकाल. यामध्ये आधीच अस्तित्वात असलेला स्टिकर पॅक डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

मेसेज
iOS 17 सह, Apple यूजर्सना पूर्वीपेक्षा अधिक मनोरंजक अनुभव मिळतो. यूजर्सना नवीन स्टिकर लायब्ररीमध्ये लाइव्ह फोटोमधून तयार केलेले लाइव्ह स्टिकर्स मिळतात. यासोबतच यूजर्स हे स्टिकर्स इतर अॅप्समध्येही वापरू शकतात. मेसेजद्वारे प्राप्त झालेल्या नवीन वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, रिप्लायसाठी क्विक जेस्चर, लोकेशन शेअर, लास्ट मेसेजवर जाण्याचा पर्याय मिळतो.

फोन
नवीन अपडेटसह, यूजर्सना फोन अॅपमध्ये कॉल स्क्रीन कस्टमाइझ करण्याचा पर्याय मिळतो. यूजर्स त्यांच्या आवडीचे फॉन्ट, इमोजी आणि इतर एलिमेंट्स वापरू शकता. या वैशिष्ट्याच्या मदतीने, आयफोन वापरकर्ते त्यांची कॉल स्क्रीन युनीक, तसेच विविध कॉलरसाठी कस्टमाइझ करू शकतात. यासह, iOS 17 च्या नवीन लाइव्ह व्हॉईसमेल फिचर्समध्ये, यूजर्सना इनकमिंग कॉलचे लाइव्ह ट्रान्सक्रिप्शनचा पर्याय मिळतो, ज्यामुळे यूजर्स व्हॉइसमेल वाचू शकतात.

स्टँडबाय फीचर्स
नवीन अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टममध्ये, यूजर्सना नवीन स्टँडबाय फीचर्स मिळतात, ज्यामध्ये आयफोन एका स्मार्ट डिस्प्लेमध्ये बदलतो, डिस्प्लेवर वेळ आणि फोटो टाकू शकता. या फीचर्सच्या मदतीने, बॅटरीचा वेळ ऑप्टिमाइझ केला जाऊ शकतो. 

इतर वैशिष्ट्ये
iOS 17 मध्ये, जेव्हा रिसीवर फेसटाइम कॉलला उत्तर देत नाही तेव्हा iPhone यूजर FaceTime वर व्हिडिओ संदेश पाठवू शकतात. याशिवाय, जर आपण नवीन OS च्या फीचर्सबद्दल बोललो तर सफारीमध्ये प्राइवेसी फीचर्स, हेल्थमध्ये मेंटल हेल्थ फीचर्स, मॅप्समध्ये ऑफलाइन मैप्स, Apple Music मध्ये कलैबरैटिव प्लेलिस्टसह इतर सुरक्षा आणि गोपनीयता अपडेट्स आहेत.

जर्नल अॅप्स
iOS च्या नव्या अपडेटसह, जर्नल अॅप यूजर्सना त्यांचे विचार आणि अनुभव सहजपणे डिजिटल जर्नलमध्ये सेव्ह करता येतील. हे यूजर्सना त्यांचे महत्वाचे फोटो, व्हिडीओ आणि मेमरी सहजपणे ट्रॅक करण्यास अनुमती देते. यासोबतच यूजर्स जर्नल्समध्ये फोटो, मॅप लोकेशन्स आणि म्युझिक लिंक्स देखील जोडू शकतात.

संबंधित बातम्या

Iphone 15 : अमेरिका, युरोपसोबत भारतातही Iphone 15 एकाच वेळी होणार लॉंच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget