iOS 16.3 Release Date : आता iPhone यूजर्सना मिळणार अधिक सुरक्षा आणि अप्रतिम फीचर्स; अपडेटेड iOS 16.3 लवकरच होणार उपलब्ध
iOS 16.3 Release Date : आयफोन यूजर्सना लवकरच iOS 16.3 चे अपडेट मिळणार आहे. यामध्ये लोकांना पूर्वीपेक्षा चांगली सुरक्षा आणि अॅडव्हान्स फीचर्स मिळतील.
iOS 16.3 Release Date : Apple चा प्रीमियम iPhone जगभरात लोकप्रिय आहे. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी आयफोन घ्यायची इच्छा असते. अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा आयफोनमध्ये उत्तम सुरक्षा आणि ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध आहे. यामुळेच अनेक लोकांना त्यांच्या प्रायव्हसीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आयफोन घ्यायला आवडतो. आता, आयफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर, Apple लवकरच यूजर्सना iOS 16.3 अपडेट देणार आहे. माहितीनुसार, कंपनी पुढील आठवड्यापर्यंत जगभरातील आयफोन यूजर्ससाठी हे अपडेट लाईव्ह करु शकते. या अपडेटमध्ये तुम्हाला काय नवीन मिळेल ते जाणून घ्या.
ही वैशिष्ट्ये iOS 16.3 अपडेटमध्ये उपलब्ध असतील
Apple ने iOS 16.3 अपडेटमध्ये एक नवीन वैशिष्ट्य जोडले आहे जे आयफोन यूजर्सला म्युझिक होमपॉडवर ट्रान्सफर किंवा बंद करण्याची परवानगी देईल.
आपत्कालीन sos सेटिंग्जमध्ये देखील अपडेट उपलब्ध असेल
MacRumors च्या मते, iOS 16.3 मधील iPhone यूजर्ससाठी आपत्कालीन sos सेटिंग बदलण्यात आली आहे. म्हणजेच, आता ही सेटिंग अधिक स्पष्ट आणि सोपी झाली आहे. कंपनीने आता 'कॉल विथ होल्ड' बदलून 'कॉल विथ होल्ड अँड रिलीज' केले आहे, तर 'कॉल विथ 5 प्रेस' बदलून 'कॉल विथ 5 बटण प्रेस' केले आहे. त्याचप्रमाणे, नवीन अपडेटमध्ये, तुम्हाला 'Call Countdown' 'Call Silently' असे दिसेल.
Apple आयडी सिक्युरिटी की वर अपडेट करा
नवीन अपडेटमुळे आयफोन यूजर्सना त्यांचा Apple आयडी अधिक चांगल्याप्रकारे सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. iOS 16.3 मध्ये, कंपनीने नवीन सिक्युरिटी की सादर केल्या आहेत ज्यामुळे यूजर्सना त्यांचा Apple आयडी अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी हार्डवेअर सिक्युरिटी कीचा वापर करण्याची परवानगी देईल. एकदा तुम्ही हे फीचर ऑन केलं तर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणखी बळकट होईल.
याप्रमाणे iOS 16.3 अपडेट करा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आयफोन या अपडेटसाठी एलिजीबल असावा. जर तुमचा फोन एलिजीबल असेल तर सेटिंगमध्ये जा आणि इथे जनरलच्या ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट दिसेल, त्यावर क्लिक करा आणि ते डाऊनलोड करा. एकदा डाऊनलोड केल्यानंतर, ते इन्स्टॉल करा आणि मोबाईल फोन एकदा रिस्टार्ट करा. यासह, नवीन अपडेट तुमच्या मोबाईल फोनमध्ये अधिक चांगलं काम करण्यास सुरुवात करेल आणि आयफोन वापरण्याचा नवा अनुभव युझर्सना मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :