आला रे आला! अखेर Google Pixel 8a भारतात लॉन्च; दमदार बॅटरी, हायटेक फिचर्स असलेल्या फोनची किंमत काय?
Google Pixel 8a Features : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या Pixel 8 मालिकेतील हा सर्वात स्वस्त फोन आहे. Pixel 8a ची किंमत Pixel 7a पेक्षा जास्त आहे.
Google Pixel 8a Launch in India : बहुप्रतिक्षित, बहुचर्चित गुगलचा Google Pixel 8a अखेर भारतात लॉन्च झाला. गेल्या अनेक दिवसांपासून गॅझेटप्रेमी या स्मार्टफोनची आतुरतेनं वाट पाहत होते. आता त्यांची प्रतिक्षा संपली असून भारतात Google Pixel 8a उपलब्ध होणार आहे. या हँडसेटमध्ये अनेक नवनवीन फिचर्स, दमदार कॅमेरा आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या Pixel 8 मालिकेतील हा सर्वात स्वस्त फोन आहे. Pixel 8a ची किंमत Pixel 7a पेक्षा जास्त आहे. या स्मार्टफोनमध्ये Tensor G3 चिपसेट, 120Hz OLED डिस्प्ले आणि 64MP कॅमेरा आहे.
Google Pixel 8a ची किंमत 52,999 रुपये आहे. यात 128GB इंटरनल स्टोरेज आहे. तर 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे. त्याची प्री-ऑर्डर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. Google Pixel 8a पहिली विक्री 14 मे रोजी सकाळी 6:30 वाजता सुरू होईल. गुगल 4 हजार रुपयांची बँक ऑफर देत आहे. निवडक बँकांवर नऊ कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. यासह तुम्ही 9,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस घेऊ शकता. Google 4 हजार रुपयांची बँक ऑफरही देत आहे. काही ठराविक बँका नो कॉस्ट EMI चा ऑप्शनही देत आहेत. यासोबतच 9,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचाही तुम्ही फायदा घेऊ शकता.
The new #Pixel8a is designed to help you…
— Google (@Google) May 7, 2024
📸 Take amazing photos
⏳ Save time
🔒 Keep info secure
Meet the latest #Pixel device, online and in-stores May 14 ↓ https://t.co/RHV4ur66ow
Google Pixel 8a चे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
Google Pixel 8a मध्ये 6.1-inch FHD+ OLED डिस्प्ले दिला आहे. यामध्ये 120Hz का रिफ्रेश रेट्स, 1400Nits HDR ब्राइटनेस, 2000 Nits चा पीक ब्राइटनेस आणि Gorilla Glass 3 ची प्रोटेक्शन लेयर देण्यात आली आहे.
Google Pixel 8a चा प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज
Google Pixel 8a मध्ये Google Tensor G3 चिपसेट चा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये 8GB LPDDR5x RAM सोबत 128GB आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आलं आहे.
Google Pixel 8a चा कॅमेरा सेटअप
Google Pixel 8a मध्ये डुअल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 64MP चा प्रायमरी कॅमरा आहे, जो 8x Super Res Zoom Optical आणि इलेक्ट्रोनिक इमेज स्टेबलायजेशनसोबत येतो. यामध्ये 13MP ultra-wide कॅमेरा देण्यात आला आहे, जो 120-डिग्री फील्ड व्यूला कॅप्चर करु शकतो.
Google Pixel 7a आणि Google Pixel 8a मध्ये फरक काय?
Google Pixel 7a मध्ये अशाच प्रकारचा कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. परंतु Google ने काही लोकप्रिय फिचर्सचा Google Pixel 8a मध्ये समाविष्ट केला आहे. यात मॅजिक एडिटर, बेस्ट टेक आणि ऑडिओ मॅजिक इरेजरचा समावेश आहे. Pixel 8a मध्ये अल्ट्रा HDR मोड आहे, तर Pixel 7a मध्ये हे फिचर नाही.
Google Pixel 8a ची बॅटरी
Google Pixel 8a मध्ये 4,492mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट वायर चार्जिंग आणि Wireless Qi चार्जिंग सपोर्टसह येते. Google चा दावा आहे की, हा फोन एकदा फुल चार्ज केल्यानंतर 24 तासांपासून 72 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकतो. यामध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आलेला आहे. डस्ट आणि वॉटर रेसिस्टंससाठी IP67 रेटिंग देण्यात आली आहे.