एक्स्प्लोर

New Phone Launch : ठरलं! 'या' दिवशी गुगल पिक्सेल 7a होणार लॉन्च, फोन 'या' दिवशी होणार भारतात दाखल

Google Pixel 7a Launch: गुगलने आपल्या नवीन पिक्सेल स्मार्टफोनची लॉन्च तारीख जाहीर केली आहे. कंपनीने यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

Google Pixel 7a Launch Date: गुगल कंपनी 11 मे रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Pixel 7a लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या नवीन स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती ट्विट करत दिली आहे. ट्विटमध्ये फोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. तरी मिळालेल्या माहितीनुसार, हा नवीन फोन पिक्सेलच्या सिरीजमधला Pixel 7a हाच असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला विविध स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स मिळतील. जे गुगल पिक्सेल 6a (Google Pixel 6a) पेक्षा अधिक चांगले असतील. गुगलचे फोन हे फोटोग्राफीसाठी चांगले मानले जातात. जाणून घेऊया गुगलच्या नवीन पिक्सेल 7a (Google Pixel 7a) मधील स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स...

नवीन स्मार्टफोनमध्ये मिळू शकतात हे स्पेसिफिकेशन्स

कंपनी हा स्मार्टफोन 10 मे रोजी त्याच्या आगामी I/O 2023 इव्हेंटमध्ये जागतिक स्तरावर लॉन्च करेल, यानंतर 11 मे रोजी गुगल पिक्सेल 7a (Google Pixel 7a) भारतात लॉन्च होईल. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल, जो 120hzच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यापूर्वी, Pixel 6a मध्ये 90Hzचा रिफ्रेश दर उपलब्ध होता.

Pixel 7a मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा असेल. समोर 10.8MP कॅमेरा सेल्फीसाठी मिळू शकतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये Google Tensor G2 चिपसेट आणि 4400 mAh बॅटरी मिळू शकते. Google pixel 7a 8GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह लॉन्च केला जाऊ शकतो.

इतकी असू शकते किंमत

Google pixel 7a दोन स्टोरेज प्रकारांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, ज्याची किंमत (Google pixel 7a Price) 45 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते. गुगलने स्मार्टफोनची किंमत अद्याप अधिकृतपणे उघड केलेली नाही. 128 GB आणि 256 GB अशा दोन स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध होऊ शकतो.

गुगलच्या आधी 'ही' कंपनी लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन 

गुगलच्या आधी, 9 मे रोजी, पोको (Poco) भारतात पोको F5 (POCO F5) मालिका लॉन्च करेल. या अंतर्गत, दोन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले जाणार आहेत, पहिला Poco F5 5G आणि दुसरा Poco F5 Pro 5G. या सिरीजची किंमत जवळपास 30 हजार रुपये इतकी असू शकते.

हेही वाचा:

Summer Effecsts : सनबर्न घालवायचाय? 'या' घरगुती उपायांद्वारे मिळवा स्किन टॅनिंगपासून सुटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Rakul Preet Singh's Brother Aman Preet Singh Arrest :  अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pooja Khedkar knee : पूजा खेडकरचा गुडघा 7 टक्के अधू असल्याचं प्रमाणपत्र समोरTOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP MajhaTOP 80 News | सकाळी आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaMajha Gav Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात?  पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात? पोलीस महासंचालकांनी अहवाल मागवला
Rakul Preet Singh's Brother Aman Preet Singh Arrest :  अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत, कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न
Emraan Hashmi : चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
चित्रपटात कसा शूट होतो इंटिमेट सीन? 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीने सांगितली पडद्यामागची गोष्ट...
Kolhapur : श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, नेमका काय असतो हा सोहळा?
Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची
Horoscope Today 16 July 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मार्गातील अडथळे होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Ajit Pawar: अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
अजितदादा नवाब मलिकांसोबत स्नेहभोजनात एकाच पंगतीला बसले, मनमोकळ्या गप्पाही मारल्या, आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
Narayan Surve :  कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांची पुण्याई कामाला आली, चोराने डल्ला मारलेल्या वस्तू परत दिल्या, भावनिक चिठ्ठी लिहित म्हणाला....
Embed widget