Google Chromeचे ब्राऊझिंग हिस्ट्रीशी संबंधित 'हे' फीचर लवकरच येणार, होणार हा फायदा...
Google Chrome : गुगल आपल्या ब्राउझरमध्ये आणखी एक फीचर जोडण्याच्या तयारीत आहे. क्विक डिलीट (Quick Delete) असे या नवीन फीचरचे नाव आहे.

Google Chrome : गुगल (Google) अनेकदा आपल्या वेब ब्राउझर गुगल क्रोम ब्राउझरमध्ये (Google Chrome Browser) नवीन फीचर्स आणत राहतो. या दमदार फीचर्समुळे गुगलच्या (Google) ब्राउझर इतर ब्राउझरपेक्षा वेगळे दिसतो आणि तसाच परफॉर्म देखील करतो. या अपडेटेड आणि आधुनिक फीचर्सच्या सीरीजमध्ये गुगल आपल्या ब्राउझरमध्ये आणखी एक फीचर जोडण्याच्या तयारीत आहे. क्विक डिलीट (Quick Delete) असे या नवीन फीचरचे नाव आहे. क्विक डिलीट फीचरचा वापर करून तुम्ही शेवटच्या 15 मिनिटांचा ब्राउझिंग हिस्ट्री (Quick Delete) सहजपणे डिलीट करू शकता. हे फीचर अधिकृतपणे युजर्ससाठी कधी आणले जाईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याच फीचरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Google Chrome : 15 मिनिटांची ब्राउझिंग हिस्ट्री करता येईल डिलीट
सध्या अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्सना Chrome ब्राउझरमध्ये 4 आठवडे, 7 दिवस, 24 तास आणि शेवटचा एक तास ब्राउझिंग हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्याय मिळतो. क्रोमस्टोरीच्या रिपोर्टनुसार, गुगल क्रोममध्ये क्विक डिलीट नावाचे फीचर जोडले जाणार आहे. फीचरच्या माध्यमातून यूजर्स काही सेकंदात शेवटच्या 15 मिनिटांची ब्राउझिंग हिस्ट्री डिलीट करू शकतील. विशेष बाब म्हणजे या फीचरचा सपोर्ट अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्हीमध्ये दिला जाईल. असं असलं तरी Google ने या फीचर्स च्या रोल आउटबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. हे फीचर आल्यानंतर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांत वापरलेली प्रत्येक वेबसाइट निवडून आपल्या ब्राउझर हिस्ट्रीमधून (google chrome history delete) डिलीट करता येईल.
Google Chrome : नवीन सेफ्टी फीचर्सची टेस्ट सुरु
अलीकडे ही माहिती समोर आली आहे की, गुगलने (Google) एक फेक वेबसाइट ब्लॉकर फीचर आणले आहे, जे युजर्सला बनावट वेबसाइट वापरण्यापासून तसेच Malicious फाइल्स डाउनलोड करण्यापासून प्रतिबंधित करते आणि तसेच युजरला अलर्ट करते. तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून गुगल आपला क्रोम ब्राउझर सेफ करण्याचा प्रयत्न करत आहे. अलिकडच्या काळात कंपनीने अनेक सेफ्टी फीचर्स आणले आहेत. यासह अनेक सेफ्टी फीचर्सवर काम देखील सुरु आहे. यासह गुगल आपला ब्राउझर (Google Chrome Browser) अधिक फास्ट काम करावा, यासाठीही नवीन अपडेट आणू शकतो. जे नजीकच्या काळात युजर्सला पाहायला मिळू शकतात.
हेही वाचा:
सॅमसंगचा हा स्मार्टफोन पुन्हा झाला स्वस्त झाला, जाणून घ्या किती आहे किंमत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
