Google : खोटी जाहिरात दिल्यामुळे Google ला भरावा लागणार दंड, या दंडाची रक्कम आहे तब्बल 65 कोटी रूपये
आपल्या एका चुकीमुळे गुगलला तब्बल 65 कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासाठी अमेरिकेतील टेक्सास प्रांताचे अॅटर्नी जनरल केन पॅक्सटन (Ken Paxton) यांनी गुगलवर केस दाखल केली होती.
Google : जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगलच्या (Google) एका चुकीमुळे 65 कोटीपेक्षा जास्त दंड भराव लागणार आहे. ही दंडाची रक्कम अमेरिकन सरकारकडे जमा करावी लागणार आहे. याचं कारण गुगलनं टेक्सासमध्ये पिक्सल 4 स्मार्टफोनची खोटी जाहिरात चालवली होती. यासाठी फेडरल सरकारसह टेक्सास प्रांताचे (Texas) ऍटर्नी जनरल केन पॅक्सटन (Ken Paxton) यांच्या कार्यालयाकडून कंपनीवर केस दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता गुगलला अमेरिकन सरकारकडे 65 कोटीपेक्षा जास्त दंड भरण्याची वेळ आली आहे.
गुगलनं केली ही चूक
टेक्सासचे अॅटर्नी जनरल केन पॅक्सटन यांच्या कार्यालयाकडून गुगलवर एक आरोप केला आहे की, गुगलनं टेक्सास राज्यात दोन रेडिओ अनाऊन्सर यांची नियुकी केली आणि त्यांच्याकडून पिक्सल 4 स्मार्टफोनची खोटी जाहिरात करवून घेतली आहे. कंपनीनं रेडिओ अनाऊन्सर्सना हा स्मार्टफोन यूज करू दिला नाही. तसेच अगोदरच लिहिण्यात आलेली स्क्रिप्ट रेडिओवरून ऑन एअर केली. हे बाजाराच्या नियमाविरूद्ध असल्याचं ऍटर्नी जनरल केन पॅक्सटन यांनी सांगितलं आहे. ते पुढे म्हणाले की, कंपनीला टेक्सासमध्ये व्यवसाय करायचा असेल, तर लोकांना सत्य सांगावं लागेल. पण त्यांनी जर खोट्या जाहिराती चालवल्या तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
दरम्यान, याप्रकरणी गुगलच्या प्रवक्त्या जोसे कास्टनेडा (Jose Castaneda) यांनी सांगितले की, "कंपनी जाहिरात कायद्यांचा गांभिर्यानं विचार करते आणि याविषयी देण्यात आलेल्या आदेशाचं आम्ही पालन करू."
यापूर्वी सॅमसंग आणि Huawei या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती. या कंपन्यांनी DSLR छायचित्राला मोबाईलचं छायचित्र असल्याचं जाहिराती केल्या होत्या. गुगलवर खोट्या जाहिराती दाखल्याचा आरोप आहेच. याशिवाय गुगलवर टेक्सासचे अॅटर्नी जनरल केन पॅक्सटन आणि फेडरल सरकारनं 'फेस डाटा' कलेक्शनाच्या प्रकरणात याआधीच केस दाखल केली होती.
अलीकडेच गुगलनं लाँच केला स्मार्टफोन
नुकतंच गुगलनं आपल्या I/O 2023 च्या कार्यक्रमात पिक्सल 7a स्मार्टफोनला जागतिक स्तरावरून लाँच केलं होतं. या स्मार्टफोनला भारतात 11 मे रोजी लाँच करण्यात आलं होतं. या फोनमध्ये 6.1 इंची एफएचडी प्लस अमोलेड डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन 90hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये 4300 एमएएच इतकी पावरफुल बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, या फोनमध्ये बॅक साईचा कॅमेरा 64 आणि दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. फोनच्या फ्रंट साईडला 10.8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, अॅण्ड्रॉई़ड 13 असून 5 वॅटच्या वायरलेस चार्चिंगला सपोर्टेड असल्याचं समजतं.