एक्स्प्लोर

Google Drive News : Google अलर्ट! कोट्यवधी यूजर्सना पोहोचू शकतो धोका; चुकूनही 'या' चुका करू नका

Google Drive News : गुगलने स्पॅमबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही गुगल ड्राईव्ह वापरत असाल तर तुम्ही हॅकिंगला बळी पडू शकता.

Google Drive News : जर तुम्ही देखील गुगल ड्राईव्हचा (Google Drive) वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओसह अनेक महत्त्वाच्या फाईल्सचा डेटा उपलब्ध आहे. अशातच हा डेटा एके दिवशी अचानक लीक झाला तर? याच संदर्भात सर्च इंजिन गुगल (Google) ने Google Drive यूजर्सना स्पॅम अटॅकच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. कारण ही परिस्थिती तुमच्यासाठी धोकादायक देखील असू शकते. अशा वेळी हा धोका टाळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आणि कोणती काळजी घ्यावी लागेल? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

गुगलकडून हा अलर्ट विशेषत: अशा यूजर्ससाठी आहे जे Google Drive चा वापर करतात. या इशाऱ्यात गुगलने स्पॅमबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुम्ही गुगल ड्राईव्ह वापरत असाल तर तुम्ही हॅकिंगला बळी पडू शकता, असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या रिपोर्टनुसार, गुगल ड्राईव्हवर गुगल अकाउंट यूजर्सना एक संशयास्पद फाईल पाठवली जातेय. अनेक यूजर्सने या संदर्भात तक्रार केली आहे की त्यांना त्यांच्या Google अकाऊंटवर फाईल्स प्राप्त करण्याची विनंती प्राप्त झाली आहे. Google ने या संदर्भात सांगितलं आहे की, अशा स्पॅम अटॅकबाबत माहिती आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद फाईल आढळली तर ती स्पॅम रेंजमध्ये मार्क करा.

गुगलने सल्ला दिला आहे की, जर तुम्ही कोणतीही संशयास्पद फाईल (Accpt) स्वीकारण्यास मंजुरी दिली असेल तर त्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच, मंजूर झालेले कोणतेही डॉक्युमेंट्स ओपन करू नका. 

कसं संरक्षण कराल?

यूजर्स अशा प्राप्त कोणत्याही संशयास्पद फाईल तक्रार करू शकतात. यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर दिलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर टॅप करावे लागेल. जर तुमच्या कॉम्प्युटरवर फाईल ओपन झाली असेल तर तुम्हाला फाईलवर राईट क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक किंवा रिपोर्ट या पर्यायावर टॅप करावं लागेल.

अशा फाईल्सचा रिपोर्ट करा 

Google ड्राईव्ह यूजर्स संशयास्पद दिसणाऱ्या फाईल्स स्पॅम फोल्डरमध्ये मार्क करू शकतात. Gmail प्रमाणे, ड्राईव्हमधील स्पॅम फोल्डर संभाव्य धोकादायक फाईल्स सेव्ह करतात ज्या एखाद्या अकाऊंटशी संलग्न किंवा लिंक केल्या जाऊ शकतात. यूजर्स फक्त त्या फोल्डरमध्ये फाईल्स ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या :

SIM Card New Rule : मोबाईलचं Sim Card खरेदी करताय? सावध व्हा, TRAI कडून सिमकार्डचे नवीन नियम जारी; 'या' गोष्टी 1 जुलैपासून होतील बंद

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget