एक्स्प्लोर

Google Doodle: किट्टी ओ'नील यांची 77 वी जयंती; गूगलचं खास डूडल

किट्टी ओ'नील (Kitty O’Neil) यांची आज 77 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल (Google Doodle) करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

Google Doodle: द फास्टेस्ट वूमन इन द वर्ल्ड (The Fastest Woman In The World) म्हणजेच 'जगातील सर्वात वेगवान महिला' हा क्राऊन ज्यांना देण्यात आला होता, त्या  किट्टी ओ'नील (Kitty O’Neil) यांची आज 77 वी जयंती आहे. किट्टी या अमेरिकन स्टंट परफॉर्ममर, डेअरडेव्हिल आणि रॉकेट पॉवर्ड व्हेइकल ड्रायव्हर होत्या. त्यांला लहानपणापासूनच ऐकू येत नव्हते. आज त्यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल (Google Doodle) करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

किट्टी ओ'नील यांचा जन्म 24 मार्च 1946 रोजी कॉर्पस क्रिस्टी टेक्सास येथे झाला. त्यांची आई अमेरिकन होत्या  तर वडिल हे आयरिश होते. किट्टी ओ'नील या जेव्हा काही महिन्यांच्या होत्या, तेव्हा त्यांना अनेक आजार झाले ज्यामुळे त्यांनी श्रवणशक्ती गमावली. त्यानंतर त्यांनी कम्युनिकेशनचे अनेक प्रकार शिकून घेतले. लिप रिडींग देखील त्या करत होत्या. किट्टी यांनी यांना डायव्हिंगची आवड निर्माण झाली, परंतु मनगटाची दुखापत आणि आजारपणामुळे त्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकत नव्हत्या.

किट्टी ओ'नील यांनी वॉटर स्कीइंग आणि मोटारसायकल रेसिंग यांसारख्या हाय-स्पीड स्पोर्ट्स खेळण्यास सुरुवात केली.  हेलिकॉप्टरमधून उडी मारणे यासारखे स्टंट्स त्या करत होत्या. त्यांनी द बायोनिक वुमन (1976), वंडर वुमन (1977-1979), आणि द ब्लूज ब्रदर्स (1980) या चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील स्टंट परफॉर्म केले. स्टंट अनलिमिटेड या हॉलिवूडमधील टॉप स्टंट परफॉर्ममर या संस्थेमध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. किट्टी ओ'नील या 1976 मध्ये द फास्टेस्ट वुमन अलाइव्ह (The Fastest Woman Alive) म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

गूगलचं खास डूडल

गूगलनं किट्टी ओ'नील  यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त खास डूडल केलं आहे. हे डूडल वॉशिंग्टन डीसी येथील गेस्ट आर्टिस्ट मीया त्जियांग यांनी डिझाइन केलं आहे. या डूडलमध्ये किट्टी ओ'नील यांचे चित्रपट दिसत आहे. त्यांच्या हातात हेल्मेट देखील दिसत आहे. या डूडलमध्ये हेलिकॉप्टर देखील आहे. या हेलिकॉप्टरमधून एक व्यक्ती खाली पडताना दिसत आहे. तसेच डूडलमध्ये एक रेसिंग कार देखील आहे. 

किट्टी ओ'नील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 

सायलंट व्हिक्ट्री : किट्टी ओ'नील स्टोरी (Silent Victory: The Kitty O’Neil Story) हा 1979 मध्ये रिलीज झालेला चित्रपट किट्टी ओ'नील यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

International Women’s Day 2023: जागतिक महिला दिनानिमित्त गूगलचं डूडल; पाहा काय आहे खास?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget