International Women’s Day 2023: जागतिक महिला दिनानिमित्त गूगलचं डूडल; पाहा काय आहे खास?
आज 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) निमित्त गूगलनं (Google Doodle) एक खास डूडल तयार केलं आहे. जाणून घ्या गूगलच्या या खास डूडलबद्दल...
International Women’s Day 2023: इंटरनेट सर्च इंजिन असलेलं गुगल (Google) आज जगातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. गुगलचे (Google Doodle) विविध डिझाइन्सचे डूडल अनेकांचे लक्ष वेधतात. आज 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) निमित्त गुगलनं एक खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. जाणून घ्या गुगलच्या या खास डूडलबद्दल...
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव
'जागतिक महिला दिन' हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. यानिमित्तानं गुगलकडून खास डूडल तयार करण्यात आलं आहे. या डूडलमध्ये एक महिला भाषण करताना दिसत आहे तर काही महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या दिसत आहे. ग्रह, ताऱ्यांचे निरिक्षण करणाऱ्या महिला देखील या डूडलमध्ये दिसत आहेत. ज्येष्ठ महिला तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी महिला देखील या डूडलमध्ये दिसत आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर महिलांचे हात दिसतील. या हतात निळ्या आणि जांभळ्या रंगाचे झेंडे दिसतात.
गुगल डूडल आर्टिस्टनं व्यक्त केल्या भावना
जागतिक महिला दिनाचं हे गूगल डूडल आर्टिस्ट, अॅलिसा विनान्सद्वारे (Alyssa Winans) डिझाइन करण्यात आलं आहे. अॅलिसा विनान्सनं या डूडलबद्दलची भावना देखील व्यक्त केली. तिनं यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या डूडलबाबत सांगितलं की, आमची यावर्षीची डूडलची थिम ही 'वुमन सपोर्टिंग वुमन' ही आहे.
जाणून घ्या महिला दिनाच्या इतिहासाबद्दल
8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र येऊन प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Women's Day 2023 : महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजेच 'जागतिक महिला दिन'; वाचा या दिनाचा इतिहास