Intern Salary in Tech Company : नोकरीच्या शोधात असणाऱ्या फ्रेशर किंवा इंटर्न्ससाठी गुड न्यूज; 'या' कंपन्यांकडून महिन्याला मिळणार 7 लाख रुपये पगार
सध्या मार्कटमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्या फ्रेशर्ससाठी महिन्याला तब्बल 7 लाख रूपये इतक्या पगाराची नोकरी ऑफर करत आहेत. ही ऑफर फ्रेशर्स किंवा इंटर्नशिपच्या शोधात असणाऱ्या तरूणाईसाठी असणार आहे.
Fresher Salary in Tech Company : चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असं स्वप्न अनेकांचं असतं. यासाठी पदवी किंवी मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एखाद्या कंपनीत काही वर्ष काम करावं लागतं. यानंतरचं चांगल्या पगाराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पण अशातच फ्रेशर किंवा इंटर्नशिपसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाईसाठी एक गुड न्यूज आहे. आता गुड न्यूज आहे तरी काय? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. ऑनलाईन क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्या (Tech Company) फ्रेशर्स किंवा इंटर्नशिपच्या शोधात असणाऱ्या तरुणाईसाठी महिन्याला चक्क लाखो रुपयांच्या पगाराची ऑफर करत आहेत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. कारण सध्या बाजारात लोकांना महिना 15,000 ते 25,000 हजार इतक्या पगारावर काम करावं लागतं. इतक्या पगाराच्या नोकरीसाठी पुणे-मुंबई यासारख्या मेट्रो शहरातही खूप स्ट्रगल करावं लागतं. कित्येक वर्ष लोक कमी पगारावरच काम करतात. या सगळ्यांमध्ये फ्रेशर किंवा इंटर्नशिपवाल्यांची प्रचंड वाईट अवस्था असते. कारण फ्रेशर्ससाठी खूप कमी पगार दिला जातो. काही काही कंपन्यामध्ये तर महिन्याला वेळेत पगार दिला जात नाही. तरी नाईलाजास्तव लोकांना नोकऱ्या कराव्या लागतात. पण आज आपण फ्रेशर्ससाठी महिना लाखो रुपये पगार (Fresher Salary) देणाऱ्या कंपन्यांची माहिती घेऊया...
'या' कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी मिळतो लाखो रुपये पगार
सध्या बाजारात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची झुंबड पाहायला मिळते. मग कमीत कमी 15,000 हजार इतका पगार मिळाला तरी लोकं नोकरी स्वीकारतात. पण तुम्हाला जर एखाद्या कंपनीकडून महिन्याला लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी ऑफर आली तर? होय. हे खरं आहे. बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्या फ्रेशर्ससाठी महिन्याला तब्बल 7 लाख रुपये इतका पगार ऑफर करत आहेत. ही ऑफर मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि अॅमेझाॅन या कंपन्यांकडून दिली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटामुळे याच कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण आता इतक्या पगाराच्या नोकरीची ऑफर देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण फ्रेशर्ससाठी महिन्याला तब्बल 7 लाख रुपये इतका पगार देत आहेत. ग्लासडोर या वेबसाईटवर इच्छुक स्वत:ची ओळख लपवून कंपन्यांची माहिती घेऊ शकतात. अर्थात, ही ऑफर अमेरिकेतील सॅलरीच्या पॅकेजनुसार असणार आहे. पण याची भारतातील सॅलरी पॅकेजसोबत तुलना केली जाऊ शकत नाही, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. इतक्या जास्त पगाराची नोकरी ऑफर करणाऱ्या काही टाॅप कंपन्यांच्या यादीवर नजर टाकूया.
जाणून घेऊया टाॅप 10 कंपन्यांची यादी
1. स्टाईप कंपनी : महिना 7.4 लाख रुपये
2. रोबॉक्स कंपनी : महिना 6.7 लाख रुपये
3. काॅईनेबेस कंपनी : महिना 6.7 लाख रुपये
4. एनवीडिया : महिना 6.7 लाख रुपये
5. मेटा कंपनी : महिना 6.6 लाख रूपये
6. कॅपिटल वन कंपनी : महिना 6.6 लाख रुपये
7. क्रेडिट सुईस कंपनी : महिना 6.5 लाख रुपये
8. बॅन अॅण्ड कंपनी : महिना 6.4 लाख रुपये
9. अॅमेझाॅन कंपनी : महिना 6.4 लाख रुपये
10. ईवाई-पार्थेनाॅन कंपनी : महिना 6.2 लाख रुपये