एक्स्प्लोर

X Streaming Feature : आता ट्विटरवरही पैसे कमावण्याची संधी! मस्क आणणार नवं फिचर

X New Streaming Feature : एलॉन मस्क ट्विटरवर (Twitter New Feature) नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

X Twitter Streaming Feature : एलॉन मस्क (Elon Musk) आता सोशल मीडिया (Social Media) मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर एक्स (Twitter X) युजर्ससाठी एक खूशखबर घेऊन आले आहेत. आता ट्विटर (Twitter) म्हणजे एक्स (X Social Media App) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पैसे कमावण्याची संधी (Twitter Video Game Streaming Feature) मिळणार आहे. काही काळापूर्वी ट्विटरने लोकांना थेट व्हिडीओ प्रसारित करण्याची सुविधा दिली आहे. आता एलॉन मस्क युजर्सना आणखी एक फीचर आणणार आहेत. लवकरच तुम्हाला एक्स म्हणजेच ट्विटर (Twitter) वर गेम स्ट्रिमिंग करता येणार आहे. 

एक्सवर गेम स्ट्रिमिंग फिचर येणार

मस्क यांनी एक्सवरील पोस्टमध्ये यासंबंधित एक व्हिडीओही शेअर केला आहे. मस्क यांनी सांगितलं की, एक्स (X) ट्विच (Twitch) सारख्या व्हिडीओ गेम स्ट्रीम करण्यासाठी नवीन फिचरची चाचणी करत आहे. ट्विच (Twitch) ही एक अमेरिकन व्हिडिओ गेम स्ट्रीमिंग सेवा (American Video Live Streaming Service) आहे.

आता ट्विटरवरही पैसे कमावण्याची संधी

यामध्ये सध्या तुम्ही फक्त लाइव्ह स्ट्रिमिंग करु शकता आणि स्ट्रीमचा वेग वाढवू शकता. सध्या यामध्ये व्हिडीओ गुणवत्ता अपग्रेड करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. एलॉन मस्क यांच्या हाती ट्विटरचं पाखरू आल्यापासून कंपनीने अनेक बदल केले आहेत. लोगो आणि नाव बदलल्यानंतर मस्क सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) मध्ये अनेक बदल करताना दिसत आहेत. आता मस्क युजर्ससाठी आणखी एक नवीन फिचर आणणार आहेत.

ट्विटरवरील नवीन फिचरचा गेमर्सना फायदा होणार

एलॉन मस्क यांनी जूनमध्ये या नव्या फीचरसंदर्भात घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, एक्स (X) मध्ये व्हिडीओ गेम स्ट्रीम करण्यासाठी एक फीचर लाँच करण्यात येणार आहे. मस्क यांनी गेम स्ट्रीमबाबत ही मोठी घोषणा करण्याच्या एक दिवस आधीच ट्विचने नवीन नियम लागू केले होते. यामुळे गेम स्ट्रीमर्सवर परिणाम झाला. यानंतर, गेमर्सने ट्विचद्वारे गेम स्ट्रीमिंग थांबवले आणि यूट्यूब (YouTube) आणि फेसबुक (Facebook) वर उडी घेतली. 

91 दशलक्षाहून अधिक युजर्सना फायदा होणार 

ट्विटर (Twitter) च्या अहवालानुसार, जून 2020 आणि जून 2021 दरम्यान, ट्विटरवर अंदाजे 91 दशलक्ष गेमर होते ज्यांनी दर सेकंदाला गेमिंग-संबंधित सुमारे 70 ट्वीट पोस्ट केले. याचा अर्थ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात युजर्स हे गेमर्स आहेत. यामुळे मस्क यांनी या युजर्ससाठी नवीन फिचर आणल्यास ते ट्विटरसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे ट्विटर X ला अधिक युजर्स मिळविण्यातही मदत होईल. याशिवाय युजर्सही गेम स्ट्रिमिंग करून पैसे कमवू शकतील. X ने काही महिन्यांपूर्वीच एड्स रेवेन्यू कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत कंपनी YouTube सारख्या लोकप्रिय क्रिएटर्सना दर महिन्याला पैसे देते.

महत्वाच्या इतर बातम्या :

Whatsapp Ban : व्हॉट्सॲपकडून मोठी कारवाई! 74 लाखांहून जास्त भारतीय अकाऊंट बॅन, 'या' कारवाईचं कारण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget