(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPhone 14 Offer : iPhone 15 लॉन्च होण्यापूर्वी iPhone 14 वर मिळेल प्रचंड सूट, काय आहे आॅफर घ्या जाणून
आयफोन 15 लॉन्च होण्यापूर्वी तुम्हाला आयफोन 14 वर मोठ्या डिस्काउंटचा फायदा मिळत आहे.
IPhone 14 Discount : आयफोन लव्हर्सकरता एक खूशखबर आहे. आता खरे तर आयफोन 15 लवकरच लाँच होणार आहे मात्र इतर जुने Apple मॉडेल म्हणजेच IPhone 14 स्वस्त झाले आहेत. यावेळी तुम्हाला iPhone 14 वर बंपर डिस्काउंटचा लाभ मिळत आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart इत्यादींवर सवलतीत उपलब्ध आहे. दरवेळेप्रमाणेच आयफोनची नवीन सीरीज लॉन्च होण्यापूर्वी जुने आयफोन कमी किंमतीत उपलब्ध आहेत. परंतु ही उपकरणे खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती आणि ते कधी खरेदी करावे? परंतु आयफोन 15 लॉन्च होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, पण तुम्हाला आयफोन 14 अतिशय कमी किंमतीत आता मिळू शकणार आहे.
मात्र iPhone 15 मध्ये 3,877mAh बॅटरी मिळू शकते, तर iPhone 14 मध्ये तुम्हाला 3,279mAh बॅटरी मिळेल. A16 बायोनिक चिपसेट iPhone 14 Pro उपलब्ध आहे. परंतु आगामी फोनमध्ये A17 बायोनिक चिपसेट येऊ शकतो. तुम्ही एकतर नवीन आयफोन 15 सीरीज लाँच होण्याची वाट पाहू शकता किंवा थोडा वेळ थांबल्यास तुम्हाला आणखी स्वस्त किंमतीत आयफोन 14 खरेदी करण्याची संधी मिळेल.
iPhone 14 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला फोनमध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले, A15 बायोनिक चिप आणि ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. तुम्ही हा फोन 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकता. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 5G सपोर्ट, वाय-फाय, ड्युअल सिम (Dual SIM), ब्लूटूथ, जीपीएस (GPS) आणि चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी, iPhone 14 मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा (Camera) सेटअप आहे ज्यामध्ये मोठा f/1.5 अपर्चर, सेन्सर-शिफ्ट OIS आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेकेंडरी शूटर असलेला 12-मेगापिक्सेल वाइड-अँगल मुख्य सेन्सरचा समावेश आहे. iPhone 14 च्या स्पेसिफिकेशन (Specification) बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. मोबाईल फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सेलचे 2 कॅमेरे आणि समोर 12 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. iPhone 14 IOS16 वर काम करतो आणि A15 बायोनिक चिपसेट यात सपोर्ट करण्यात आला आहे. तुम्ही लाल, निळा, मिडनाईट ब्लॅक, पर्पल, स्टारलाईट आणि अलीकडे जोडलेल्या पिवळ्या रंगात देखील iPhone 14 खरेदी करू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
Apple : जून तिमाहीत Apple ने केली मोठी कमाई , ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली माहीती