एक्स्प्लोर

Apple iPhone 17 Launch : टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला! उद्या iPhone 17 भव्य लाँच इव्हेंट; भारतात बेस मॉडेलची किंमत कितीवर जाणार?

भारतीय ग्राहकांच्या नजर मुख्यत्वे किंमतीवर खिळली आहे.  या सोबतच नवे Apple Watch, AirPods Pro 3 आणि काही हार्डवेअर अपडेट्सचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.

iphone 17 Launch Event: जगभरातील टेकप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत असलेला ॲपलचा वार्षिक शो म्हणजे “Awe Dropping” इव्हेंट उद्या (9 सप्टेंबर) रात्री भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ॲपल आपली नवी iPhone 17 सीरिज सादर करणार आहे. यावेळी स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्स, अधिक ऍडव्हान्स कॅमेरा सिस्टीम आणि अधिक स्लिम डिझाइन असे बदल अपेक्षित आहेत. मात्र भारतीय ग्राहकांच्या नजर मुख्यत्वे किंमतीवर खिळली आहे.  या सोबतच नवे Apple Watch, AirPods Pro 3 आणि काही हार्डवेअर अपडेट्सचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.

किंमतीत वाढ होणार का?

तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन संस्था Techarc च्या अहवालानुसार, भारतात iPhone 17 च्या बेस मॉडेलची किंमत साधारण ₹86,000 पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या iPhone 16 च्या बेस मॉडेलपेक्षा जवळपास ₹6,000 ने जास्त. iPhone 16 ची किंमत ₹79,900 ठेवण्यात आली होती.

तज्ज्ञांच्या मते, iPhone च्या किंमती आणि USD-INR विनिमय दर यांचा थेट संबंध आहे. मागील काही वर्षांत आयफोनच्या किंमती दरवर्षी सरासरी 7.6% ने वाढल्या, तर रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास 5.2% ने घसरला. वास्तविक महागाईचा विचार केला तर किंमतवाढ दरवर्षी केवळ 2.4% इतकी आहे.

iPhone किंमतींचा प्रवास

  • 2008 : iPhone 3G – ₹31,000

  • 2010 : iPhone 4 – ₹34,500

  • 2012 : iPhone 5 – ₹45,500

  • 2014 : iPhone 6 – ₹53,500

  • 2016 : iPhone 7 – ₹60,000

  • 2017 : iPhone 8 – ₹64,000

  • 2017 : iPhone X – ₹89,000

  • 2020 ते 2024 : iPhone 12 ते iPhone 16 – ₹79,900

  • 2025 अंदाज : iPhone 17 – ₹86,000

भारतात उत्पादन, तरीही किंमत वाढ

ॲपल आता भारतातच iPhone 17 चे असेंब्ली उत्पादन करणार आहे. मात्र प्रोसेसर, कॅमेरे आणि डिस्प्ले यांसारखे महत्वाचे पार्ट्स आयात करावे लागतात. त्यामुळे परकीय चलनातील बदलांचा परिणाम अंतिम किंमतीवर होणारच. स्थानिक उत्पादनामुळे सप्लाय चेन मजबूत होईल, पण ग्राहकांना किंमतीत फारसा दिलासा मिळेल असं दिसत नाही.

Techarc च्या अंदाजानुसार, 2025 मध्ये भारतात ॲपलचे शिपमेंट 1.5 crore units पर्यंत जाऊ शकते. यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात ॲपलचा हिस्सा 12-15% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दशकभरापूर्वी हा हिस्सा फक्त 1-1.5% इतकाच होता.

ग्राहकांची उत्सुकता शिगेला

आता भारतीय ग्राहकांच्या नजरा पूर्णपणे ॲपलकडे लागल्या आहेत. iPhone 17 मध्ये slim design, सुधारित AI फीचर्स, दमदार कॅमेरे आणि बॅटरी परफॉर्मन्समध्ये कोणते बदल दिसणार, हे पाहण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमी उत्सुक आहेत. उद्याच्या इव्हेंटमध्ये ॲपल खरोखरच iPhone 17 बेस मॉडेलसाठी ₹86,000 ची किंमत जाहीर करते का, की भारतीय बाजारासाठी खास रणनीती आणते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
BMC Election Results 2026: राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
राज्यातील 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजप फक्त 9 ठिकाणी स्वबळावर, बेडूक कितीही फुगला तरी...; सुषमा अंधारेंनी 'गावठी चाणक्य' म्हणत हिणवलं
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
Embed widget