iPhone 13, 13 Pro आणि 13 Pro Max मध्ये नेमका कोणता फरक आहे? कोणता कॅमेरा आहे बेस्ट? वाचा A to Z माहिती
iPhone 13 Series : iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये iPhone 13 प्रमाणेच 12MP वाइड आणि अल्ट्रा-वाइड लेन्स आहेत.
iPhone 13 Series : जर तुम्ही इन्स्टाग्राम रिल्स, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि फोटोंसाठी नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या सगळीकडे आयफोन 13 सीरिजची खूप चर्चा आहे. याचं कारण म्हणजे आयफोनमध्ये तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरा मिळतो. या सीरिजमध्ये तुम्हाला सिनेमॅटोग्राफी मोड मिळतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max च्या कॅमेऱ्यातील फरक सांगणार आहोत.
iPhone 13, 13 Pro आणि 13 Pro Max च्या कॅमेरा सिस्टीममध्ये 'हे' फरक आहेत
iPhone 13 : iPhone 13 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12MP अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 12MP वाईड लेन्सचा समावेश आहे. फोटो आणि व्हिडीओसाठी iPhone 13 चांगला आहे.
iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max
iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये iPhone 13 प्रमाणेच 12MP वाईड आणि अल्ट्रा-वाईड लेन्स आहेत. पण, तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा 2x ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो लेन्स देखील मिळतात. टेलीफोटो लेन्स फोटोग्राफीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स मिळतो.
iPhone 13 Pro आणि 13 Pro Max च्या कॅमेरामध्ये काय फरक आहे?
iPhone 13 Pro आणि 13 Pro Max मध्ये थोड्याफार प्रमाणात सारखीच कॅमेरा सिस्टम आहे. पण या दोघांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत हे फरक कोणते ते जाणून घ्या.
सेन्सर : iPhone 13 Pro Max मध्ये एक मोठा सेन्सर देण्यात आला आहे, ज्यामुळे कमी प्रकाशात चांगले फोटो येतात.
ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन : आयफोन 13 प्रो आणि 13 प्रो मॅक्स दोन्हीमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आहे. पण 13 प्रो मॅक्सचं स्टेबलायझेशन चांगला परफॉर्मन्स देते.
नाईट मोड : दोन्ही आयफोनमध्ये नाईट मोड देण्यात आला आहे. पण, 13 प्रो मॅक्सचा नाईट मोड अधिक चांगला आहे आणि यामुळे रात्रीचे चांगले फोटो आणि व्हिडीओ काढता येतात.
टेलीफोटो लेन्स : आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स दोन्हीमध्ये 12MP टेलिफोटो लेन्स आहे. पण,13 प्रो मॅक्सची लांबी जास्त आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक झूम वाढवता येते.
एकूणच, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्समध्ये उत्तम कॅमेरा सिस्टम उपलब्ध आहे. पण, फोन खरेदी करणं हे तुमच्या बजेटवरही अवलंबून असतं. जर तुमचा बजेट कमी असेल तर आयफोन 13 देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :